व्हीआयपी दर्शन देण्यावरून अंबाबाई मंदिरात वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हीआयपी दर्शन देण्यावरून अंबाबाई मंदिरात वाद
व्हीआयपी दर्शन देण्यावरून अंबाबाई मंदिरात वाद

व्हीआयपी दर्शन देण्यावरून अंबाबाई मंदिरात वाद

sakal_logo
By

74071

व्हीआयपी दर्शनावरून
अंबाबाई मंदिरात वाद

भाविक, सुरक्षारक्षकांमध्ये खडाजंगी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रविवारी भाविक व सुरक्षा रक्षक यांच्यात वादविवादाचा प्रकार घडला. अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी रांगेतून येणाऱ्या भाविकांना डावलून व्हीआयपी दर्शनासाठी भाविकांना रांगेत घेतल्याने हा वाद उफाळला. रांगेतून येणाऱ्या भाविकांनी सुरक्षारक्षकांना याबद्दल खडेबोल सुनावले.
दरम्यान, अंबाबाईच्या दर्शनासाठी पर्यटकांसह भाविक पहाटेपासूनच गर्दी करतात. दर्शनरांगेतून देवीचे मनाजोगे दर्शन घेता येईल, यासाठी तासन्‌तास दर्शनरांगेत उभे राहतात. मात्र, मंदिर प्रशासनाकडून व्हीआयपी व्यक्तींना शनी मंदिराजवळील प्रवेशद्वारावरून रांगेत प्रवेश दिला जातो. रविवारीही असाच प्रकार घडला. पर्यटक भाविकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी सुरक्षारक्षकांना याबाबत शंका उपस्थित केली. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्यांना दाद न दिल्याने हा वाद चिघळला. हे भाविक सुरक्षारक्षकांच्या अंगावरही धावून गेल्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर अंबाबाई मंदिरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दर शनिवारी-रविवारी तसेच सुट्टीच्या काळात अंबाबाई दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. अशा वेळी व्हीआयपी दर्शनाचीही मागणी होते. देवस्थान समितीही व्हीआयपी दर्शनाची ‘सोय’ करून देते. मात्र, रांगेतील भाविक यावर आक्षेप घेतात. असे वादाचे प्रसंग नेहमी मंदिरात घडत असतात. या प्रकारामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने लक्ष घालून खबरदारीचे उपाय करावेत, अशी मागणी यावेळी भाविकांनी व्यक्त केली.