मल्हार सेनेतर्फे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मल्हार सेनेतर्फे सत्कार
मल्हार सेनेतर्फे सत्कार

मल्हार सेनेतर्फे सत्कार

sakal_logo
By

74069

ईर्ष्या विसरून गावाचा विकास करा
आण्णासाहेब डांगे : धनगर समाजातील सरपंच, सदस्यांचा सत्कार सोहळा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयाने तुम्हाला चांगली संधी मिळाली आहे. चांगले काम करत रहा. चांगल्या कारभारातून नावलौकिक मिळवा. निवडणुका संपल्या आहेत त्यामुळे निवडणुकीतील ईर्ष्या विसरून एकोप्याने गावाचा विकास करा, असे आवाहन धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी रविवारी केले. महाराष्ट्र राज्य धनगर महासंघ प्रणित मल्हार सेना, युवक संघटना व अहिल्या महिला संघटना यांच्यातर्फे ग्रामपंचायत निवडणुकीताल विजयी झालेल्या धनगर समाजातील सरपंच व सदस्यांच्या सत्कार सोहळा झाला. या वेळी ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी बबनराव रानगे होते.
माजी मंत्री डांगे म्हणाले, ‘‘अटकेपार भगवा फडकवण्याचे महान कार्य मल्हारराव होळकर यांनी केले. त्यानंतर ब्रिटिशांबरोबर युद्ध करून स्वराज्याचे व भगव्या निशाणाचे रक्षण करण्याचे काम छत्रपती यशवंतराव होळकर यांनी केले. अशा शूरवीरांचे आपण वंशज आहोत याचे भान ठेवून कारभार करावा.’’
रानगे म्हणाले, ‘‘भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकांमध्येही संख्याबळ वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे.’’ चंद्रकांत पाटील यांनी ‘माझा गाव, माझे कर्तव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. गोकुळ संचालक बयाजी शेळके, छगन नांगरे यांनी मनोगत व्यक्त केले.
बाबूराव बोडके, बापूसाहेब ठोंबरे, सिद्धार्थ बन्ने, भगवान हराळे, पांडुरग वगरे, सचिन सलगर, रामचंद्र रेवडे, डॉ. संदीप हजारे, लिंबाजी हजारे, बाळासाहेब दाईंगडे, शशिकांत पुजारी, नवनाथ गावडे, अमोल हराळे, कृष्णात रेवडे, मायाप्पा धनगर, सुरेश धनगर, बबलू फाले, विक्रम शिणगारे, शामराव माने, दत्ता बोडके, धोंडिराम कात्रट उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. वैष्णवी रानगे यांनी केले. आभार राघू हजारे यांनी मानले.