निपाणी ः दरोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निपाणी ः दरोडा
निपाणी ः दरोडा

निपाणी ः दरोडा

sakal_logo
By

मुख्य अंक पान १
----------------------
nip०५०६
73965
कोगनोळी : येथील सी. वाय. पाटील यांच्या घरातील फोडलेली तिजोरी.

nip०५०७&nip०५०८
73966
कोगनोळी : चोरट्यांचा माग काढण्यासाटी श्वानपथक तपास करताना.

nip०८२०
74061
सी. वाय. पाटील

nip०८२१
74062
ऐश्वर्या घोरपडे

nip०८२२
कोगनोळी ः दरोडा पडलेले पाटील यांचे घर.
-----------------------------------

कुटुंबाला मारहाण करून
कोगनोळीत जबरी चोरी
---
२५ तोळ्यांसह रोकड लुटली; वडील-मुलगी जखमी

सकाळ वृत्तसेवा
कोगनोळी, ता. ८ : येथील हणबरवाडी रोडवरील एका घरात चोरट्यांनी कुटुंबातील दोघांना जबर मारहाण करून घरातील २५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रकमेसह सुमारे १३ लाखांचा ऐवज लांबविला. काल (ता. ७) मध्यरात्री ही घटना घडली. दरोडेखोरांच्या मारहाणीत सी. वाय. पाटील व त्यांची मुलगी ऐश्वर्या घोरपडे हे जखमी झाले आहेत. या रात्री चोरट्यांनी एकूण पाच घरे फोडली. इतर ठिकाणी त्यांच्या हाती जास्त काही लागले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, की हणबरवाडी रोडवर सी. वाय. पाटील यांचे घर आहे. काल मध्यरात्री दोनच्या सुमारास मागील दाराचा कडीकोयंडा मोडून चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला. स्वयंपाक खोलीत जाऊन मौल्यवान वस्तूंचा शोध घेतला. त्या वेळी तेथे असलेले साहित्य विस्कटून टाकले. बाजूच्या खोलीत काही मिळते का, हे पाहण्यासाठी तिथे गेल्यावर घरात सी. वाय. पाटील, पत्नी रेखा पाटील व मुलगी ऐश्वर्या घोरपडे झोपलेले होते. त्या वेळी आपल्याला हे लोक पाहतील, म्हणून अचानक दरोडेखोरांनी सी. वाय. पाटील यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी वडिलांना मारहाण करीत असल्याचे पाहून मुलगी ऐश्वर्या सोडविण्यासाठी गेली असता तिलाही चोरट्यांनी मारहाण केली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. मारहाणीनंतर चोरटे घरातील ३० तोळे सोने व रोख रक्कम घेऊन पसार झाले. जिवाच्या भीतीने पाटील कुटुंबीय काहीच करू शकले नाहीत. दरोडेखोर निघून गेल्यावर पाटील कुटुंबीयांनी बाहेर येऊन आरडाओरडा केला. शेजारचे लोक जमा झाले व तत्काळ श्री. पाटील व मुलगी ऐश्वर्या यांना कागल येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पाटील यांना जबर मार लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी चिक्कोडीचे पोलिस उपअधीक्षक बसवराज यलीगार, निपाणी मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरीच्या घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व श्वानपथक बोलावण्यात आले. चित्रा या श्वानाने घटनास्थळापासून हणबरवाडी रोडवर असणाऱ्या ढोबळे पाणंद येथील अशोक मगदूम यांच्या शेतापर्यंत चोरट्यांचा माग दाखविला.

वर्षारंभीच दुसरी चोरी
जानेवारीच्या सुरुवातीलाच हालसिद्धनाथनगर येथील भोपाल कोळेकर यांच्या घरी चोरी झाली होती. या ठिकाणी रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. वर्षारंभीच कोगनोळी गावात चोरीची दुसरी घटना घडली असून, नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चौकट...
रात्रीत पाच घरे फोडली
मध्यरात्रीच माळी गल्ली येथील संध्या सूर्यवंशी यांच्या घराच्या दाराची कडी मोडून घरात प्रवेश करून किरकोळ चोरी केली; तर याच गल्लीतील सदाशिव माळी यांच्या घराची कडी मोडून घरात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण, या ठिकाणी त्यांना काही मिळाले नाही. हणबरवाडी रोडवर असणाऱ्या मारुती पाटील यांच्या दाराची कडी मोडून घरात प्रवेश केला. या ठिकाणी किरकोळ चोरी केली. इथूनच काही अंतरावर असणाऱ्या रावसाहेब धना पाटील यांच्या घराचे दार मोडण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही.