वारे वसाहतीमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या १२ जणांवर हद्दपारीची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारे वसाहतीमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या १२ जणांवर हद्दपारीची कारवाई
वारे वसाहतीमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या १२ जणांवर हद्दपारीची कारवाई

वारे वसाहतीमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या १२ जणांवर हद्दपारीची कारवाई

sakal_logo
By

व्ही. सी. बॉईज टोळीतील १२ जण जिल्ह्यातून हद्दपार

एक वर्षासाठी कारवाई; सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः वारे वसाहतीमधील व्ही. सी. बॉईज टोळीतील १२ जणांवर आज एक वर्षाच्या हद्दपारीची कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी याबाबतचे आदेश दिले.
वारे वसाहत परिसरात काही दिवसांपासून सतत मारामारी, धमकावणे, दशहत पसरविणे या प्रकारचे गुन्हे घडत होते. येथील व्ही. सी. बॉईज या टोळीतील काही सदस्य यात सक्रिय होते. या टोळीतील दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या गुंडांचा प्रस्ताव जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी बनवला होता. शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी तीन महिन्यांपूर्वी हा प्रस्ताव परिपूर्ण करून मंजुरीसाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलवकडे यांच्याकडे पाठविला होता. यावर पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सुनावणी घेतली. यानंतर महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५५ नुसार या टोळीतील १२ जणांवर हद्दपारीची कारवाई केली. या टोळीला एक वर्षासाठी जिह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. संजय अशोक आवळे, स्वप्नील ऊर्फ सागर संजय चौगुले, सरदार अशोक आवळे, गजानन अनिल गणेशाचार्य, विश्वजित विजय चौगुले, निवास अशोक आवळे, विलास अशोक आवळे, अमित संजय घाडगे, अक्षय महादेव लोखंडे (सर्व रा. वारे वसाहत, मंगळवार पेठ), अवधूत किरण खटावकर (रा. हनुमाननगर, पाचगाव रोड), धीरज राजेश शर्मा (जोतिर्लिंग कॉलनी, पाचगाव), स्वप्नील सुनील गाडेकर (रा. सुभाषनगर) अशी त्यांची नावे आहेत.