
अश्विनी पाटील आदर्श युवा कृषी उद्योजक
74266
अश्विनी पाटील आदर्श युवा कृषी उद्योजक
इचलकरंजी : शिरदवाड येथील अश्विनी पाटील यांची कृषी मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय कृषी विस्तार संस्था, हैदराबाद यांच्या आदर्श युवा कृषी उद्योजक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते दिल्ली येथे पुरस्काराचे वितरण होईल.
--------------------------
कोरोचीत बनशंकरी देवी उत्सव
इचलकरंजी : कोरोचीमध्ये हटकर कोष्टी समाजातर्फे प्रथमच शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आयोजित बनशंकरी देवीच्या प्रतिमेचे पूजन व महाप्रसाद उत्साहात झाला. सरपंच संतोष भोरे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. हटकर कोष्टी समाजाचे अध्यक्ष विजय कडगावे यांनी स्वागत केले. प्रशांत तुरंबेकर यांच्या हस्ते बनशंकरी देवीच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती झाली. डॉ. नंदकुमार वसवाडे, शिवकांत मेत्री, इराण्णा सिंहासने, अमित खानाज आदी उपस्थित होते.
--------------
विजय ग्रंथाचे वाचन
इचलकरंजी : संत गजाजन महाराज मंदिरात जागतिक पारायण दिनाचे औचित्य साधून गजानन विजय ग्रंथाचे वाचन मराठे कराड यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. या वेळी १०१ भक्तांनी पारायण केले. त्यानंतर श्रींची आरती होऊन महाप्रसादाचे वाटप झाले. स्वप्नील आवाडे यांनी संत गजानन महाराजांची कृपा आवाडे घराण्यावर असल्याचे सांगितले. किरण दंडगे, शरद पाध्ये, भाऊसो पाटील, उमेश जाधव, राजू हिरेमठ, नागेश शेरीगार, नीतेश जाधव, प्रज्ञा शिंदे, विद्या सांगोलेकर, महेश गोमेवाडीकर उपस्थित होते.