आवश्‍यक दोन बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्‍यक दोन बातम्या
आवश्‍यक दोन बातम्या

आवश्‍यक दोन बातम्या

sakal_logo
By

‘एस.टी.’चे उद्यापासून सुरक्षितता अभियान
कोल्हापूर : दरवर्षी जानेवारीत राज्यभरात अपघात सुरक्षितता अभियान राबविण्यात येते. यावर्षी सुरक्षितता अभियानाचा कालावधी ११ ते २५ जानेवारी असा असेल. या अभियानांतर्गत राज्य परिवहन महामंडळातील सर्व आगारांमध्ये चालकांचे आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्यात येईल. परिवहन विभाग, पोलिस विभाग, इतर सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींमार्फत महामंडळातील चालकांना अपघात टाळण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात येईल, अशी माहिती कोल्हापूर विभाग नियंत्रकांनी पत्रकाद्वारे दिली. प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास वृद्धिंगत करणे, राज्य परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, सुरक्षित वाहतुकीसाठी घालून दिलेली कार्यपद्धत पाळण्यावर भर देण्यात येतो. राज्य परिवहन महामंडळाच्या बसना अपघात होणार नाहीत, याबाबत योग्य ती काळजी सदैव घेणे हा सुरक्षितता मोहिमेचा उद्देश आहे. या कालावधीत विभागातील सर्व आगारांमध्ये चालक, वाहकांची आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन केले आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांना आगारांत निमंत्रित करून अपघात सुरक्षितता, ताणतणाव व्यवस्थापन, व्यसनमुक्ती आदी विषयांवर व्याख्यानांचे आयोजन केले आहे.
...
ाचारचाकी वाहनांची दुरुस्ती सेवा आज
कोल्हापूर : जिल्हा फोर व्हिलर वर्कशॉप ओनर वेल्फेअर असोसिएशन आणि रिसर्च फाउंडेशनतर्फे अंगारकी संकष्टीनिमित्त भाविकांच्या सेवेसाठी मंगळवारी (ता. १०) श्री गणपतीपुळे येथे चारचाकी वाहनांची दुरुस्ती सेवा देण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष योगेश पाटील यांनी पत्रकाद्वारे केले. श्री गणपतीपुळे, हॉटेल विसावा, चाफे तिट्टा (जि. रत्नागिरी) येथे पार्किंगच्या ठिकाणी सेवा देण्यात येईल.
...
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पारितोषिक वितरण
कोल्हापूर : गडमुडशिंगी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण झाले. डॉ. राजेंद्र पाटील यांच्या हस्ते मुलांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन झाले. तानाजी मोरे यांच्या हस्ते चित्रकला प्रदर्शनाचे, डॉ. संदीप हजारे यांच्या हस्ते रांगोळी प्रदर्शनाचे, तर श्रीपती गायकवाड यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. खेळात शालेय, जिल्हा, राज्यस्तरावर नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. सरपंच अश्विनी शिरगावे, उपसरपंच तानाजी पाटील, डॉ. शरद शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. मुख्याध्यापक डी. ई. गायकवाड यांनी आभार मानले.