पोलिस सोसायटी निवडणूक बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस सोसायटी निवडणूक बिनविरोध
पोलिस सोसायटी निवडणूक बिनविरोध

पोलिस सोसायटी निवडणूक बिनविरोध

sakal_logo
By

पोलिस सोसायटीची निवडणूक बिनविरोध
कोल्हापूर ः कोल्हपूर पोलिस सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पाच उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे एकूण जागा इतकेच उमेदवार रिंगणात असल्यामुळे निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. एस. ठाकरे यांनी काम पाहिले. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे मार्गदर्शन लाभले. बिनविरोध निवड संचालक असे - सर्वसाधारण प्रतिनिधी दत्तात्रय दुर्गुळे, जितेंद्र कुलकर्णी, संजय पडवळ, विजय कोळी, शामसुंदर बुचडे, दादामियॉं कापसे, महिला प्रतिनिधी - हेमलता पाटील, विमल साळुंखे, इतर मागार प्रतिनिधी- सरदार कुंभार, अनुसुचित जाती व जमाती प्रतिनिधी - सतीश कुरणे, भटक्या विमुक्त जाती व इतर मागासप्रवर्ग प्रतिनिधी - गणेश नलवडे.