Sun, Feb 5, 2023

पोलिस मुख्यालय झाडे तोड
पोलिस मुख्यालय झाडे तोड
Published on : 9 January 2023, 5:30 am
‘त्या’४६ झाडांच्या
तोडीबाबत मनपा
मागवणार हरकती
कोल्हापूर, ता. ९ ः पोलिस मुख्यालयाच्या आवारातील पोलिस वसाहतीच्या बांधकामासाठी अडथळा ठरणाऱ्या ४६ झाडांच्या तोडीबाबत महापालिका हरकती मागवणार आहे. आंबा, फणस, पिंपळ, जांभळ, नारळ अशा विविध प्रकारची झाडे त्या परिसरात आहेत.
पोलिस मुख्यालयातील ४६ झाडे बांधकामासाठी तोडायची असल्याने महापालिकेच्या उद्यान विभागाने प्रक्रियेनुसार त्यासाठी हरकत मागवण्याचे निश्चित केले आहे. पिंपळ, अशोक, रेन ट्री, शेवगा, ख्रिसमस ट्री, करंज यांची प्रत्येकी एक, निलगिरी, फणस, ऑस्ट्रेलियन बाभळ, गुलमोहर यांची प्रत्येकी दोन, उंबराची तीन, जांभळाची चार, नारळाची चौदा, आंब्याची सहा, बदामाची पाच झाडांबाबत हरकती मागवण्यात येत आहेत.