
डिग्रजकर महोत्सव बातमी
(फोटो - 74389, 74391, 74392, 74393, 74396, 74397
....
डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सवाची पर्वणी
---
दिग्गज कलाकारांचे रंगणार गायन, वादन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः कलानगरीच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या ‘पं. सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सवा’ला बुधवार (ता. ११)पासून सुरुवात होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संगीत महोत्सवात दिग्गज गायक आणि वादक आपली कला सादर करतील. राम गणेश गडकरी सभागृहात रोज सायंकाळी सहाला महोत्सव होणार आहे, अशी माहिती ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम)चे अध्यक्ष ॲड. विवेक शुक्ल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम) आणि डिग्रजकर कुटुंबीय यांच्यातर्फे दरवर्षी या सांगीतिक मेजवानीचे आयोजन केले जाते. या वर्षी बुधवार (ता. ११) ते शुक्रवार (ता. १३) या कालावधीत डिग्रजकर संगीत महोत्सव होणार आहे. या वेळी ॲड. शुक्ल म्हणाले, की या वर्षी पं. सुधाकरबुवा यांची १०१ वी जन्मतिथी आहे. रोज दोन सत्रांमध्ये सादरीकरण केले जाईल. दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे विनोदकुमार लोहिया महोत्सवाचे उद्घाटन करतील. बुधवारी स्नेहा राजुरीकर, पं. सुहास व्यास यांचे शास्त्रीय गायन होईल. गुरुवारी (ता. १२) डॉ. सुधांशू कुलकर्णी आणि सारंग कुलकर्णी यांची संवादिनी जुगलबंदी रंगणार आहे; तर दुसऱ्या सत्रात पं. विनोद डिग्रजकर शास्त्रीय गायन करतील. शुक्रवारी (ता. १३) समीहन कशाळकर आणि पद्मश्री उल्हास कशाळकर यांचे शास्त्रीय गायन होईल.
पत्रकार परिषदेला विनोद डिग्रजकर, गंधार डिग्रजकर, रामचंद्र टोपकर, श्रीकांत लिमये, अनुराधा गोसावी, संतोष कोडोलीकर, महेश कुलकर्णी, वृषाली कुलकर्णी, अशोक जोशी उपस्थित होते.