बड्याचीवाडीला जलजीवनमधून निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बड्याचीवाडीला जलजीवनमधून निधी
बड्याचीवाडीला जलजीवनमधून निधी

बड्याचीवाडीला जलजीवनमधून निधी

sakal_logo
By

बड्याचीवाडीला
जलजीवनमधून निधी
गडहिंग्लज : बड्याचीवाडी (ता. गडहिंग्लज) गावासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणी योजनेसाठी तीन कोटी ९४ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली. या योजनेतून बड्याचीवाडी गाव, काळभैरी मंदिर, खोतवाडी, सर्व गावभाग, खोरी वसाहत, डीएमकेसी कॉलनी, तोडकर माळ, धबधबा मार्ग, मोरे वसाहत, भैरी रोड, डोमणे वसाहत, जावळे वसाहत, हेब्बाळे वसाहत, पोवार वसाहत, नायकवाडी वसाहत, सोलापुरे, वसाहत, हट्टी बसवाणा, करडे, नेवडे तळ, संकेश्‍वर रोड, पाटील वसाहत, औरनाळ फाटा या भागात पाणी मिळणार आहे. सरपंच सतीश कोळेकर, उपसरपंच सुनीता दळवी, सदस्य विश्‍वास खोत, दत्तात्रय सुतार, सविता राक्षे आदींनी यासाठी प्रयत्न केल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.