
यशवंत व्याख्यानमाला
74696
कोल्हापूर : जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टीचर्स असोसिएशनतर्फे (केप्टा) आयोजित यशवंत व्याख्यानमालेत बोलताना प्राचार्य डॉ. अरुण पौडमल. शेजारी डावीकडून प्रा. विठ्ठल नाईक, प्रा. अतुल निंगुरे, प्रा. विवेक हिरवडेकर, प्रा. प्रशांत कासार.
‘यशवंत’ व्याख्यानमालेमुळे
विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल
प्राचार्य डॉ. पौडमल; ‘केएमसी’मध्ये व्याख्यान
कोल्हापूर, ता. १६ : इंग्रजी विषयाची भीती काढून टाकण्यासाठी व परीक्षेला सामोरे जाताना त्यांच्यातील आत्मबल वाढवण्यासाठी यशवंत व्याख्यानमालेचा निश्चितच उपयोग होईल. विद्यार्थ्यांसाठी सातत्यपूर्ण व्याख्यानमाला आयोजित करणे हे काम कौतुकास्पद आहे. केएमसी कॉलेजमधील बहुतांशी विद्यार्थी हे ग्रामीण परिसरातील आहेत, त्यांचे मनोबल व्याख्यानमालेमुळे वाढविणारे असल्याचे मत प्राचार्य डॉ. अरुण पौडमल यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टीचर्स असोसिएशनतर्फे (केप्टा) या वर्षी यशवंत व्याख्यानमाला केएमसी कॉलेजमध्ये आयोजित केली होती. या वेळी प्रमुख अध्यक्षीय भाषणात त्यांनी हे प्रतिपादन केले. संघटनेतर्फे गेली २० वर्षे सातत्याने ही व्याख्यानमाला इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. खास करून इंग्रजी व गणित विषयांचे अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापकांची व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जातात. या वर्षी इयत्ता बारावी आर्टस् व कॉमर्सच्या केएमसी कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाचे व्याख्यान प्रा. अतुल निंगुरे यांचे आयोजित केले होते.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत कासार यांनी प्रास्ताविक केले. कॉलेजचे सुपरवायझर प्रा. विठ्ठल नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. विवेक हिरवडेकर यांनी आभार मानले. संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुभाष देसाई, प्रा. संजय यादव, प्रा. रंगराव जाधव व विद्यार्थी उपस्थित होते.