
बालाजी विद्यालयाला कास्यपदक
ich111.jpg
74783
इचलकरंजी : सीनियर बास्केटबॉल स्पर्धेमध्ये बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कास्यपदक प्राप्त केल्याबद्दल सत्कार करताना मदन कारंडे, महेश कोळीकाल, एम. एस. रावळ आदी.
-----------
बालाजी विद्यालयाला कास्यपदक
इचलकरंजी : शिवाजी विद्यापीठ येथे झालेल्या सीनियर बास्केटबॉल स्पर्धेमध्ये येथील बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कास्यपदक प्राप्त केले. बालाजी माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने मिरज, वारणा व कोल्हापूर या संघांशी लढत दिली. अंतिम सामन्यात कोल्हापूर शहर संघासोबत संघर्षमय लढत करून तिसरे स्थान प्राप्त केले. संघामध्ये प्रगती आरोटे, ऐश्वर्या कुलकर्णी, निकिता साळी, हर्षदा खाडे, राजश्री शिंदे, उर्वी खारपंदे, रोहिणी घेवडे व साक्षी रुग्गे या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून विजय खेचून आणला. विद्यार्थ्यांना क्रीडाविभागप्रमुख राजेश चौगुले, उत्तम मेंगणे, रवी चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थापक अध्यक्ष मदन कारंडे, सेक्रेटरी महेश कोळीकाल, मुख्याध्यापिका एम. एस. रावळ यांनी गौरव केला.
------------------
आवाडे गर्ल्स हायस्कूलचे यश
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिका अंतर्गत घेतलेल्या शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत इंदूमती आवाडे गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. वेटलिफ्टिंगमध्ये मानसी विभूते प्रथम, विभागीय वेटलिफ्टिंगमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. कोल्हापूर जिल्हा असोसिएशनमार्फत घेतलेल्या वेटलिफ्टिंग ४० किलो गटात अनुष्का नाईकवाडी प्रथम, ५९ वजनी गटात मानसी विभूते द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना मुख्याध्यापक, शिक्षक यांचे मार्गदर्शन मिळाले.
--------------------
दत्तवाडला शनिवारी कुस्ती मैदान
इचलकरंजी : शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथे रेणुका देवी यात्रेचे आयोजन केले आहे. यानिमित्त दैनंदिन धार्मिक विधीप्रमाणेच मनोरंजनात्मक कार्यक्रम आहेत. शनिवारी (ता. १४) दुपारी तीन वाजता गांधी चौक येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. यानिमित्त विविध जिल्ह्यांतील मातब्बर पैलवानांच्या कुस्त्या रंगणार आहेत. या कुस्त्या माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, उद्यानपंडित गणपतराव पाटील, अमृत भोसले, करणसिंह घोरप, पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, अमित पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.