‘लायन्स’तर्फे जनजागृती फेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लायन्स’तर्फे जनजागृती फेरी
‘लायन्स’तर्फे जनजागृती फेरी

‘लायन्स’तर्फे जनजागृती फेरी

sakal_logo
By

ich112.jpg
74799
इचलकरंजी : लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीतर्फे जनजागृती फेरी काढली.
--------------
‘लायन्स’तर्फे जनजागृती फेरी
इचलकरंजी, ता. ११ : लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या वर्धापन दिनानिमित्त शहरातून जनजागृती फेरी काढली. फेरीमध्ये एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यानंतर विद्यार्थ्यांची मोबाईल शाप की वरदान, या विषयावर लायन्स क्लबच्या प्रांगणात लघुनाटिका स्पर्धा झाली.
वर्धापन दिनानिमित्त दिवसभरात अनेक सेवा कार्य घेण्यात आली. अरुण विद्यामंदिर येथे भरत भंडारी यांच्या वतीने उभारलेल्या लायन्स चिल्ड्रन्स पार्कचे उद्‍घाटन राजशेखर कापसे यांनी केले. कापसे यांनी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. आयुक्त सुधाकर देशमुख, महेंद्र बालर, विजयकुमार राठी, लक्ष्मीकांत बांगड, डॉ. विलास शहा, सुभाष तोस्निवाल, संदीप सुतार, लिंगराज कितुरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संगीता सारडा यांनी केले. आभार गजानन होगाडे यांनी मानले.