Wed, Feb 8, 2023

ओपेक्स मुलाखती
ओपेक्स मुलाखती
Published on : 11 January 2023, 1:31 am
‘ओपेक्स’मध्ये झायडस
कंपनीसाठी कॅम्पस मुलाखती
कोल्हापूर : झायडस कॅडीला ही भारतातील अग्रगण्य फार्मा कंपनी असून या कंपनीच्या गोवा युनिटसाठी १४ जानेवारीला ओपेक्स स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये मुलाखती होणार आहेत. प्रॉडक्शन आणि पॅकिंग डिपार्टमेंटसाठी होणाऱ्या या मुलाखतीसाठी डिप्लोमा इंजिनियर्स आणि डिप्लोमा फार्मसी झालेल्या इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी अर्ज करावयाचे आहेत. या पदांसाठी डिप्लोमा इंजिनीअर्स आणि डिप्लोमा फार्मसीचे पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. २०२०, २०२१, २०२२ या वर्षातील उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवार वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी www.opexindia.com वर नोंदणी करू शकतात.