पान एक-ट्रक उलटून करुळ ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-ट्रक उलटून करुळ ठप्प
पान एक-ट्रक उलटून करुळ ठप्प

पान एक-ट्रक उलटून करुळ ठप्प

sakal_logo
By

७४८८५


वैभववाडी ः करुळ घाटात ऊसाने भरलेला ट्रक उलटला.

ट्रक उलटून करुळ ठप्प
वाहनांच्या रांगा; वाहतूक भुईबावडा, फोंडाघाटातून
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ११ ः करुळ घाटात ऊसाचा ट्रक उलटल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हा अपघात आज सायकांळी पाचच्या सुमारास झाला. रस्त्यावर पडलेला ऊसाचा ढिगारा आणि अपघातग्रस्त ट्रक जेसीबीच्या साहाय्याने हटविण्याचे प्रयत्न सुरू होते. सायकांळी उशिरा या मार्गावरील वाहतूक भुईबावडा आणि फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली.
वैभववाडीतून ऊस घेऊन कारखान्याकडे (असळज, गगनबावडा) घेऊन जाणारा ट्रक करुळ घाटातील एका वळणावर उलटला. पलटी झालेला ट्रक आणि त्यातील ऊसाने बहुतांशी रस्ता व्यापल्यामुळे वैभववाडी-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे करुळ घाटरस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच करुळ तपासणी नाक्यावर असलेले हवालदार शैलेश कांबळे आणि पाटील तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ही माहिती वैभववाडी पोलिस ठाण्यात कळविल्यानंतर वैभववाडीकडील वाहतूक भुईबावडा आणि फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली. गगनबावड्यात अडकलेली वाहने देखील भुईबावडा मार्गे वळविण्यात आली. अपघातग्रस्त ट्रक आणि रस्त्यावर असलेला ऊस जेसीबीच्या साहाय्याने हटविण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले होते. बहुतांशी ऊस बाजूला करण्यात यश आले होते. सायकांळी उशिरापर्यंत ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू होते.
रस्ता दुरवस्थेमुळेच अपघात
करुळ घाटरस्ता नादुरुस्त असून अवजड वाहतुकीस धोकादायक आहे. घाटरस्त्यातील वळणांवर मोठमोठे खड्डे आहेत. खड्ड्यांमध्ये अवजड वाहने जाताना एका बाजूला कलंडण्याची शक्यता अधिक असते. आजचा अपघात देखील ट्रक खड्ड्यांतून कलंडल्यामुळेच झाला असल्याचे वाहनचालकांनी सांगितले.