दुसऱ्या घरावच धाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुसऱ्या घरावच धाड
दुसऱ्या घरावच धाड

दुसऱ्या घरावच धाड

sakal_logo
By

दुसऱ्याच घरी ईडीचा छापा
-
सासने मैदान परिसरातील प्रकार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. याचवेळी कोल्हापूर येथील सासने मैदान परिसरात असणाऱ्या त्यांच्या मुलीच्या घरावरही छापा टाकण्यासाठी ते गेले होते; मात्र त्यांच्या मुलीच्या घराऐवजी दुसऱ्याच घरावर छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली. चूक लक्षात येताच अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा निलोफर मनगोळे यांच्या घराकडे वळवला.
आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरासह इतर ठिकाणी आज ईडीने छापेमारी केली. यासोबत मुश्रीफ यांची मुलगी निलोफर यांच्या घरीही सकाळी साडेसहाच्या दरम्यान धाड टाकली जाणार होती; मात्र निलोफर यांच्या घराऐवजी दुसऱ्याच घरावर छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली. सासने मैदान परिसरात प्रतिष्ठित असणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी हे अधिकारी गेले. त्यांनाही हे काय सुरू आहे, हे समजले नाही; मात्र चुकून ज्यांच्या घरावर छापा टाकला त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता हे अधिकारी मूळ ठिकाणी परतले. मनगोळे यांच्या घरावरही प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यांच्या घराकडे येणाऱ्या-जाणाऱ्यांना मज्जाव केला. त्यानंतर सकाळपासून या ठिकाणचीही चौकशी झाली. मुश्रीफ यांचे जावई यांचीही चौकशी केली आहे. यावेळी ईडीकडून विविध प्रश्‍न विचारण्यात आले. त्या प्रश्‍नांना योग्य उत्तरे दिली आहेत. त्यामुळे ईडीकडून कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे लक्ष लागले आहे.