खांडेकर व्याख्यानमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खांडेकर व्याख्यानमाला
खांडेकर व्याख्यानमाला

खांडेकर व्याख्यानमाला

sakal_logo
By

74934
-
लोगो- वि.स. खांडेकर व्याख्यानमाला

संविधानातून देशाची अखंडता कायम
रविंद्र गोळे; ‘आपले संविधान’वर साधला संवाद

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. ११ ः ‘‘ भारतीय संविधान देशाची एकता, अखंडाता कायम राखण्याचा संदेश देते. देशात भेदभावाला स्थान नसून समता, बंधूता, मानवतेचा भाव संविधान जागृत करते. मानवी जगणे समृद्ध करण्याचा मार्ग म्हणून संविधान समजून घेण्याला प्राधान्य देणे महत्वाचे आहे, असे मत संविधानाचे अभ्यासक रविंद्र गोळे यांनी आज येथे केले.
येथील करवीरनगर वाचन मंदिरात सुरू असलेल्या भाऊसाहेब तथा वि. स. खांडेकर व्याख्यानमालेचा आज समारोप झाला यावेळी ‘आपले संविधान’ या विषयावर ते बोलत होते.
गोळे म्हणाले, ‘देशात १९४६ ला घटना समितीची स्थापना झाली. २६ नोव्हेंबराला संविधान राष्‍ट्रपतींकडे सुपूर्द केले. त्यानंतर २६ जानेवारीला देशात संविधानानुसार कारभार सुरू झाला. देशातील जाती भेद दूर करून समानता वाढीस लागावी अशी शिकवण संविधानाने दिली आहे. देशाच्या परंपरा व अधुनिकता यांचा समतोल साधून भारतीयांना सुखद जीवन जगता यावे याचे मार्गदर्शन संविधानातून लाभते. संविधानाने भारतीयांना समान मत व पत दिली आहे. त्यातील मूल्यही मानवी जगण्याला पूरक ठरणारी आहेत. समाजात दुजाभाव निर्माण होऊ नये अशा अर्थाने संविधानात काळजी घेतली आहे. त्यातील खोल अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. संविधान ज्यांनी समजून घेतले त्यांचे सामाजिक स्थान अधिक सुरक्षीत होण्यास मदत होत आहे.’’
देशातील भेदभाव कट कारस्थान देश विघातक कृत्यांना पायबंद घालण्याचे काम संविधानाने केले. असेही गोळे यांनी सांगितले
डॉ. नंदकुमार जोशी, उदय सांगवडेकर, मनिषा वाडीकर, डॉ. अशितोष देशपांडे, मनिषा शेणई उपस्थित होते. रमेश पंतगे लिखित ‘संविधान’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.