चंदगडकरांनी दुसऱ्या क्रमांकाची मते दिल्याचे शल्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगडकरांनी दुसऱ्या क्रमांकाची मते दिल्याचे शल्य
चंदगडकरांनी दुसऱ्या क्रमांकाची मते दिल्याचे शल्य

चंदगडकरांनी दुसऱ्या क्रमांकाची मते दिल्याचे शल्य

sakal_logo
By

chd121.jpg
74945
चंदगड ः आमदार राजेश पाटील यांचा सत्कार करताना ईस्माईल मुल्ला. शेजारी प्रवीण वाटंगी, अली मुल्ला आदी.
---------------------------------------
चंदगडकरांनी दुसऱ्या क्रमांकाची मते दिल्याचे शल्य
आमदार राजेश पाटील; वेणुगोपाल पतसंस्थेमार्फत नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १३ ः माझे वडील (कै.) नरसिंगराव पाटील यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ विधानसभेवर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. अनेक विकासकामे राबवली. त्यांचा वारसा चालवत असताना गेल्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील जनतेकडून पहिल्या क्रमांकाच्या मतांची अपेक्षा होती. तेथे मला दुसऱ्या क्रमांकाची मते याचे शल्य बोचत असल्याची खंत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केली.
येथील वेणुगोपाल पतसंस्थेच्या वतीने तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, तसेच आमदार पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. पतसंस्थेचे अध्यक्ष प्रवीण वाटंगी अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, ‘महाविकास आघाडी शासनाने चंदगड मतदारसंघाच्या विकासकामांसाठी अवघ्या अडीच वर्षांत ३५० कोटींचा निधी उपलब्ध केला. अल्प कालावधीत उचंगी प्रकल्प, चंदगडला ट्रामा केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालयाचा विस्तार, ऑक्सिजन प्लॅंट, आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका, शिवाजी विद्यापीठाचे केंद्र आणण्यात यशस्वी झालो.’ प्रवीण वाटंगी म्हणाले, ‘माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील यांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे काम करीत आहोत. यापुढील काळातही आमदार पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहू.’
ईस्माईल मुल्ला यांच्या हस्ते आमदार पाटील यांचा सत्कार झाला. नवनिर्वाचित सरपंच अमित चिटणीस, विठोबा गावडे, जोतिबा किरमटे यांच्यासह सदस्यांचा सत्कार झाला. रा. नि. गावडे, अली मुल्ला, एस. एल. पाटील, देवजी पाटील, पुंडलिक पाटील, महादेव ओऊळकर, बाळासाहेब हळदणकर, कलीम मदार, नौशाद मुल्ला उपस्थित होते. कृष्णा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्ही. जी. पाटील यांनी आभार मानले.