विवेकानंदांचे कार्य युवकांना प्रेरणादायी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवेकानंदांचे कार्य युवकांना प्रेरणादायी
विवेकानंदांचे कार्य युवकांना प्रेरणादायी

विवेकानंदांचे कार्य युवकांना प्रेरणादायी

sakal_logo
By

gad123.jpg
75013
गडहिंग्लज : विवेकानंद योग केंद्रातर्फे आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणप्रसंगी जे. बी. बारदेस्कर, मनीषा तेली, सुरेखा कळसगोंडा आदी.
-----------------------------------------------
विवेकानंदांचे कार्य युवकांना प्रेरणादायी
जे. बी. बारदेस्कर : विवेकानंद योग केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : स्वामी विवेकानंदांचे अतिशय साधे जीवन होते. त्यांचे महान विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. विशेष करून त्यांनी केलेले कार्य युवकांसाठी मार्गदर्शक व प्रेरणा देणारे आहे, असे मत माजी प्राचार्य जे. बी. बारदेस्कर यांनी व्यक्त केले.
ेयेथील योगगुरू राम पाटील यांच्या श्री विवेकानंद योग व ध्यान केंद्राच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा मनीषा तेली, योगसाधक उमेश देशपांडे, कार्यवाह सुरेखा कळसगोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंतीही साजरी केली. चर्चच्या सभागृहात कार्यक्रम झाला. मनीषा तेली यांचेही भाषण झाले.
योग प्रसार व प्रचारात महत्त्वपूर्ण योगदान देऊन राम पाटील यांच्या मार्गदर्शनाने अखंडपणे योगकार्य सुरू ठेवल्याबद्दल कार्यवाह सुरेखा कळसगोंडा यांचा गौरव केला. केंद्रातर्फे पुरुष व महिलांसाठी स्पर्धा घेतल्या. पुरुष गटात कलाप्पा दळवी, दिनकर राणे, भरमू रेडेकर, महिला गटात सविता पाटील, धनश्री राणे, अनुराधा गाडवी यांनी यश मिळवले. सुलभा देशपांडे, सुनंदा मगदूम, शिल्पा मंत्री, मनीषा मोहिते यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. केंद्राच्या कार्यवाहक सुरेखा कळसगोंडा यांनी स्वागत केले. मनीषा मोहिते यांनी आभार मानले.