आरपीएल सामने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरपीएल सामने
आरपीएल सामने

आरपीएल सामने

sakal_logo
By

75179
कोल्हापूर : माई ह्युंडाई सिद्धिविनायकच्या योगेश करंदीकर याचा त्रिफळा ‘आपली फार्मसी’च्या व्यंकटेश गायकवाड याने उडवला तो क्षण.
75178
कोल्हापूर : चाटे चॅम्पचा राहुल डुणूंग याला धावचित करताना लॉंगलाईफ चॅम्पियनचा खेळाडू.

75176 (या फोटोतील उजवीकडील पांढरा टी शर्ट माणूस कट करणे)
कोल्हापूर : आपली फार्मसीचा ‘सामनावीर’ व्यंकटेश गायकवाड याला सामनावीर चषक देताना योगिनी मायदेव, श्‍वेता जगदाळे, श्रृतिका पाटील.
75175
कोल्हापूर : लॉंगलाईफ चॅम्पियनचा सचिन गाडगीळ यांना सामनावीर चषक देताना अपोलोचे भगवान सावंत. शेजारी विनेश देसाई, संजय कदम, ‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, विकास जाधव, अंकुश निपाणीकर.

L75173
कोल्हापूर ः गोवा आर. सी.चा सामनावीर अशिष शिरोडकर यांना चषक देताना राजेंद्र बाड. शेजारी राजेश आडके, सरगम फलारी, विजय येवलुजे, विशाल वडेर, रविराज शिंदे.

L75183
कोल्हापूर : एमडब्ल्यूजी सुपरकिंग्जचा धीरज पाटील याला ‘सामनावीर’चा चषक देताना केशव ऊर्फ दादासाहेब कडवेकर. शेजारी संग्राम शेवडे, संजय साळोखे, दाजीबा पाटील.

आणि L75189
75189
कोल्हापूर ः आर. सी. गोवाचा सचिन परांजपे याला सामनावीरचा चषक देताना समीर जोशी. शेजारी संजय भगत, किरण वडगावकर व शैलेश देशपांडे.
००००००००००००००००००

पहिल्या दिवशी चौकार, षटकारांची आतषबाजी
एमडब्ल्यूजी सुपरकिंग्ज, गोवा आरसी, लॉंगलाईफ चॅम्पियन यांची विजयी सलामी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एमडब्ल्यूजी सुपरकिंग्ज, गोवा आरसी, लॉंगलाईफ चॅम्पियन व आपली फार्मसीने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर आज मात केली. चौकार व षटकारांच्या चौफेर टोलेबाजीने फलंदाजांनी प्रेक्षकांची मने जिंकली, तर उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन घडविणाऱ्या गोलंदाजांना टाळ्यांची दाद मिळाली. शास्त्रीनगर मैदानावर आजपासून स्पर्धेस सुरुवात झाली.

एमडब्ल्यूजी सुपरकिंग्जचा दणका
एमडब्ल्यूजी सुपरकिंग्जने आज विजयी सलामी दिली. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना आठ षटकांत ७६ धावा फटकाविल्या. त्यांच्या धीरज पाटीलने नाबाद १७ चेंडूंत ३१, जावेद महात २०, तर कर्णधार नामदेव गुरवने १५ धावा फटकाविल्या. अजित जाधव व सचिन देशमुख प्रत्येकी दोन धावा काढून बाद झाले. आपली फार्मसीकडून प्रीतेश कर्नावट, सचिन गुंड, रोहनराज शिंदे व व्यंकटेश गायकवाडने प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल आपली फार्मसीला ७६ धावांचे आव्हान पेलवले नाही. त्यांचा एकही फलंदाज दोन अंकी धावा करू शकला नाही. आपली फार्मसीला आठ षटकांत दहा गडी गमावून ३८ धावा करता आल्या. त्यांच्या मृणाल परबने सर्वाधिक ९ धावा केल्या. प्रीतेश कर्नावट ६, सचिन गुंड नाबाद ५, प्रवीण काजवे व अमित केडगेने प्रत्येकी चार, तर रोहनराज शिंदेने दोन धावा केल्या. एमडब्ल्यूजी सुपरकिंग्जकडून धीरज पाटीलने उत्कृष्ट गोलंदाजी करत सहा धावांत चार गडी बाद केले. अमित व स्टिव्हनने प्रत्येकी दोन, तर अजित जाधव व नामदेव गुरवने प्रत्येकी एक गडी बाद केला. एमडब्ल्यूजी सुपरकिंग्जचा धीरज पाटील सामनावीर ठरला.

गोवा आर.सी.कडून निसटता विजय
गोवा आर.सी.ने निसटता विजय विजय मिळविला. त्यांनी ८ षटकांत ७८ धावा केल्या. त्यांचे सहा गडी बाद झाले. सलामीचे फलंदाज अशिष शिरोडकरने २३ चेंडूंत ४१ धावा केल्या. त्यात तीन चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. सचिन परांजपेने दोन षटकारांच्या साह्याने १२ चेंडूंत २१ धावा केल्या. त्यानंतर मात्र फलंदाजांना दोन अंकी धावा करता आल्या नाहीत. इम्तियाज शेखने सहा, संग्राम फलारे तीन, तर दीपक प्रियोलकर व कर्णधार नीलेशने नाबाद दोन धावा केल्या. माई ह्युंडाई सिद्धिविनायकच्या कर्णधार रविराज शिंदेने चार, तर नागूने एक गडी बाद केला. माई ह्युंडाई सिद्धिविनायकला ८ षटकांत चार गडी गमावून ७१ धावा करता आल्या. त्यांच्या रवी मायदेवने २२ चेंडूंत २८ धावा केल्या. त्याने प्रत्येकी दोन चौकार व षटकार ठोकले. नागूने १३ चेंडूंत १७ धावांचे योगदान दिले. योगेशने ९, तर रविराज शिंदेने सहा धावा केल्या. गोवा आर.सी.कडून अशिष शिरोडकर, नीलेश मुळे व इम्तियाज शेखने प्रत्येकी एक गडी बाद केला. गोवा आर.सी.चा अशिष शिरोडकर ‘सामनावीर’ ठरला.

लॉंगलाईफ चॅम्पियनचा धडका
लॉंगलाईफ चॅम्पियनने धडक्यात विजय नोंदविला. त्यांनी ८ षटकांत ९६ धावा फटकाविल्या. त्यांचे चार गडी बाद झाले. नारायण गावडेने २८ चेंडूंत ४९ धावा केल्या. त्यात तीन चौकार व तीन षटकारांचा समावेश होता. सचिन गाडगीळने आठ चेंडूंत २०, गौरव चव्हाणने तीन चेंडूंत १४ धावा केल्या. चाटे चॅम्पकडून कर्णधार विकास जाधवने तीन, तर विशाल कल्याणकरने एक गडी बाद केला. चाटे चॅम्पच्या फलंदाजांनी शेवटच्या षटकापर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. चाटे चॅम्पला ८ षटकांत सहा गडी गमावून ७९ धावा करता आल्या. त्यांच्या विजय पंदारेने १० चेंडूंत १६, कर्णधार विकास जाधवने ८ चेंडूंत १६, तर सतीश पाटीलने पाच चेंडूंत १० धावा केल्या. विशाल कल्याणकरने आठ, राहुल डुणूंग व राहुल कुलकर्णीने प्रत्येकी सहा धावा केल्या. लॉंगलाईफ चॅम्पियनकडून सचिन गाडगीळने दोन, संजय कदम व संजय साळोखेने प्रत्येकी एक गडी बाद केला.
लॉंगलाईफ चॅम्पियनचा सचिन गाडगीळ सामनावीर ठरला.

‘आपली फार्मसी’कडून कामगिरी फत्ते
‘आपली फार्मसी’ने झटपट विजय मिळविला. विद्युतझोतात झालेल्या सामन्यात माई ह्युंडाई सिद्धिविनायकने ८ षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात ४३ धावा केल्या. रवी मायदेवच्या ११ धावा वगळता अन्य फलंदाजांना चमकदार कामगिरी करता आली नाही. योगेश करंदीकरने सहा, सचिन पाटील व महादेव नरके प्रत्येकी पाच धावा केल्या. आपली फार्मसीकडून मृणाल परबने दोन, तर व्यंकटेश गायकवाड व रोहनराज शिंदेने प्रत्येकी गडी बाद केला. आपली फार्मसीने ५ षटके चार चेंडूंत ४४ धावा फटकावून सामना जिंकला. त्यांचे चार गडी बाद झाले. व्यंकटेश गायकवाडने नाबाद १९, तर प्रीतेश कर्नावटने नाबाद १० धावा केल्या. प्रवीण काजवेने पाच, तर सचिन गुंडने चार धावा केल्या. माई ह्युंडाईकडून सचिन पाटीलने दोन, तर सचिन कदम व महादेव नरकेने प्रत्येकी एक गडी बाद केला. आपली फार्मसीचा व्यंकटेश गायकवाडला सामनावीरचा मान मिळाला.

गोवा आर.सी.चा दुसरा विजय
गोवा आरसीने ८ षटकांत पाच गडी गमावून ६८ धावा केल्या. त्यांच्या दीपक प्रियोलकरने नाबाद १६ चेंडूंत ३० धावा केल्या. सचिन परांजपेने १४ चेंडूंत १७, तर इम्तियाज शेखने नाबाद आठ चेंडूंत ११ धावा केल्या. एमडब्ल्यूजी सुपरकिंग्जकडून नामदेव गुरवने तीन, तर धीरज पाटीलने एक गडी बाद केला.
एमडब्ल्यूजी सुपरकिंग्जला ८ षटकांत ६० धावा करता आल्या. त्यांचे सात गडी बाद झाले. धीरज पाटीलने १३, तर दीपक ठाकूरने ११ धावा केल्या. अन्य फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. नामेदव गुरव, सचिन देशपांडे व अमित प्रत्येकी सहा धावांवर बाद झाले. अजित जाधवने पाच, तर जावेद महातने चार धावा केल्या. गोवा आर.सी.कडून सचिन परांजपे व नीलेश मुळेने प्रत्येकी दोन गडी बाद केले. अशिष शिरोडकर, सरगम फलारे व दीपक प्रियोलकरने प्रत्येकी एक गडी बाद केला. गोवा आर.सी.चा सचिन परांजपे सामनावीर ठरला.