
फेरीवाला कारवाई
75172
अतिक्रमण निर्मूलनकडून
५६ जणांवर कारवाई
कोल्हापूर, ता. १२ ः महापालिकेने बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी, साकोली कॉर्नर, ताराबाई रोड, जोतिबा रोड, अंबाबाई मंदिर परिसरातील ४० फेरीवाले व १६ दुकानांच्या अतिक्रमणांवर आज कारवाई केली.
या कारवाईत दुकानाबाहेर अनाधिकृत लावलेले पुतळे, पार्किंग जाळी तसेच महाद्वार रोड फेरीवाल्यांनी अनाधिकृतरित्या वाढवण्यात आलेले स्टॉल काढण्यात आले. ४० फेरीवाले, १६ दुकानांवर कारवाई करताना १४ लोखंडी स्टॅन्ड, दोन लोखंडी रिंग, सात टेबल, ३२ लोखंडी पाईप, ११ छत्री, १८ प्लास्टिक पुतळे, २१ पार्किंग लोखंडी जाळी अशा २०६ वस्तू जप्त करण्यात आल्या. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या आदेशानुसार शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन अधिकारी सचिन जाधव, मुकादम रवींद्र कांबळे, शरद कांबळे, राजू माने आदींनी कारवाई केली.