उपसरपंच निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपसरपंच निवड
उपसरपंच निवड

उपसरपंच निवड

sakal_logo
By

02013
सावर्डे दुमाला उपसरपंचपदी कदम
शिरोली दुमाला : सावर्डे दुमाला (ता. करवीर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रकाश शिवाजी कदम यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी संग्राम भोसले यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. यावेळी नूतन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. लोकनियुक्त सरपंच भगवान रोटे यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामसेवक पांडुरंग बीडकर, माजी सभापती पांडुरंग पाटील, भगवान पाडळकर, एस. आर. कारंडे, तुषार निकम, दिगंबर कारंडे, हिंदुराव भोसले, ताई खाडे, संगीता भोसले, भारती भोसले, रूपाली सुतार, अर्चना कांबळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

०२०१६
जयश्री देसाई कसबा आरळेचे उपसरपंच
शिरोली दुमाला : कसबा आरळे (ता. करवीर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयश्री संजय देसाई यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. राक्षे यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. यावेळी नूतन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार झाला. लोकनियुक्त सरपंच वैशाली भोगम, ग्रामसेवक सागर पोवार, युवराज भोगम, सचिन सुतार, लक्ष्मी कदम, अमृता पाटील, तानाजी कांबळे, भाऊसो जाधव, वैशाली देसाई, गणेश जाधव, आक्काताई सुतार, भिकाजी जाधव, सागर पाटील, धनाजी पाटील, सर्जेराव देसाई आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

02018
हिरवडे दुमाला उपसरपंचपदी विश्वास कदम
शिरोली दुमाला : हिरवडे दुमाला (ता. करवीर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विश्वास कदम यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी वाय. के. पवार यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. यावेळी नूतन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार झाला. यावेळी लोकनियुक्त सरपंच शालन गुरव, ग्रामसेवक प्रवीण खराळकर, विश्वास कदम, सुनील कांबळे, अश्विनी कांबळे, अनुसया गुरव, सदाशिव यादव, सुनीता गडकर, मेघा कदम, भगवान पाडळकर, डॉ. जी. डी. गुरव, प्रताप कदम, मारुती शा. कांबळे, नारायण कांबळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.