योगगिरी श्री.श्री.रविशंकर ३१ जानेवारीला कोल्हापुरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योगगिरी श्री.श्री.रविशंकर ३१ जानेवारीला कोल्हापुरात
योगगिरी श्री.श्री.रविशंकर ३१ जानेवारीला कोल्हापुरात

योगगिरी श्री.श्री.रविशंकर ३१ जानेवारीला कोल्हापुरात

sakal_logo
By

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे
३१ रोजी भक्ती उत्सव

श्री. श्री. रविशंकर करणार मार्गदर्शन
कोल्हापूर, ता. १२ ः आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान तपोवन मैदानावर भक्ती उत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक गुरू श्री. श्री. रविशंकर सहभागी होणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाची संधी कोल्हापूरकरांना उपलब्ध झाली आहे, अशी माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगचे महाराष्ट्र विश्वस्त प्रदीप खानविलकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
खानविलकर म्हणाले, ‘भक्ती उत्सव या उपक्रमात कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांतील साधक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. ३१ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता तपोवन मैदानावर महासत्संग होईल. यामध्ये श्री. श्री. रविशंकर मार्गदर्शन करतील. यावेळी संगीत, ध्यानही होणार आहे. १ फेब्रुवारीला वैदिक पंडितांकडून अंबाबाई होम केला जाणार आहे. यावेळीही श्री. श्री. रविशंकर यांची उपस्थिती असेल. त्यानंतर ते अंबाबाईचे दर्शन घेतील. दोन दिवसांच्या या उत्सवात समस्त करवीरवासीयांनी सहभागी व्हावे.’
यावेळी डिंपल गजवाणी, राजश्री पाटील, गीतांजली चिन्ननावर, सचिन मुधाळे, अनिता दहिभाते उपस्थित होते.