
आप युवा आघाडी
आम आदमी पार्टीतर्फे व्यवसाय परिषद
कोल्हापूर ः राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आम आदमी पार्टीतर्फे रविवारी (ता. १५) ला व्यवसाय परिषद होणार आहे. युवा आघाडीतर्फे युंगधर उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणूनही परिषद घेण्यात येणार आहे. येथील इंजिनिअरिंग असोसिशनच्या रामभाई समाणी हॉलमध्ये सायंकाळी पाच वाजता परिषद होणार आहे.
या परिषदेत आयटी असोसिएशनचे माजी अध्यक्ष विनय गुप्ते, आर्थिक सारक्षरता प्रशिक्षण केंद्राचे उदयकुमार जोशी प्रमुख मार्गदर्शन करतील. यात विविध शासकीय योजना, प्रकल्प कर्ज, सबसिडी याविषयी परिषदेत मार्गदर्शन होईल. युवा आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धेश भगत, राज्य संघटक संदीप सोनवणे, खजिनदार योगेश इंगळे प्रमुख पाहुणे असणार आहेत. जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक पाटील, आदम शेख, शशांक लोखंडे, प्रथमेश सूर्यवंशी आदीनी ही माहिती दिली.