
पाणी दिवसाआड आज सुरू
शहरात आजपासून दिवसाआड पाणी
कोल्हापूर, ता. १३ ः शहरातील ए, बी व ई वॉर्डमधील काही भागात उद्यापासून (ता. १४) दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. उद्या पहिल्यादिवशी फक्त ई वॉर्ड व संलग्न भागात पाणी दिले जाणार असून, रविवारी (ता.१५) ए, बी वॉर्ड व संलग्न भागात पाणी मिळणार आहे. सी, डी तसेच ई वॉर्डमधील कसबा बावडा परिसरातील पाणीपुरवठ्यावर काही परिणाम होणार नाही.
शिंगणापूर अशुद्ध जल उपसा केंद्राकडील पंप दुरूस्त होईपर्यंत पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार नाही. एकाचवेळी सर्वांना पाणी द्यायचे झाल्यास उंचावरील भागात पाणीच पोहचत नाही असे आजवर घडत आले. त्यातून वाद, आंदोलने होण्यापेक्षा सर्वांना पुरेशा दाबाने पाणी देण्यासाठी तीन वॉर्डमध्ये दिवसाआड पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. त्याची सुरूवात शनिवारपासून होत असून, यादिवशी केवळ ई वॉर्ड व संलग्न भागात पाणी येईल. दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. १५) या भागातील पाणी बंद करून ए , बी वॉर्ड, संलग्न उपनगरांना पाणीपुरवठा होईल. याप्रमाणे ३० जानेवारीपर्यंत नियोजन केले आहे.