
दोन दुकानांतून मांजा जप्त
75355
पापाची तिकटी येथील दोन दुकानांतून
नॉयलॉन, सिंथेटिक धाग्याच्या १२ रिंगी जप्त
कोल्हापूर, ता. १३ : महापालिकेच्या आरोग्य व परवाना विभागाने संयुक्त कारवाई करत पान लाईन येथील मुन्ना पतंग डेपो व राजू पतंग डेपोतून नॉयलॉन, सिंथेटिक धाग्याच्या १२ रिंगी जप्त केल्या. तसेच त्यांचे परवाने काढून घेण्याची कारवाई केली जात आहे. महापालिकेने अशा कारवाईसाठी तीन पथके तयार केली आहेत.
औरंगाबाद खंडपीठाकडील जनहित याचिकेवर झालेल्या आदेशानुसार प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी महापालिका स्तरावर पथक कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थापन झालेल्या पथकांमार्फत नॉयलॉन, सिंथेटिक धागा साठा व विक्री करत असलेल्या व्यावसायिकांची तपासणी करण्यात येत आहे. यातून या दोन दुकानात बंदी असलेला मांजाचा साठा असून, ते विक्री करत असल्याचे आढळले. त्यांच्यावर कारवाई करत नॉयलॉन, सिंथेटिक धाग्याच्या १२ रिंगी जप्त केल्या. उपायुक्त शिल्पा दरेकर, परवाना अधीक्षक रामचंद्र काटकर व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. त्या व्यावसायिकांचा परवाना काढून घेण्याची कार्यवाही परवाना विभाग करत आहे. आरोग्य निरीक्षक मनोज लोट, परवाना निरीक्षक बाळासाहेब जाधव, शकील पठाण यांनी कारवाई केली.