मोबाईल अॅपवर ३० लाखांचा खर्च का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल अॅपवर ३० लाखांचा खर्च का?
मोबाईल अॅपवर ३० लाखांचा खर्च का?

मोबाईल अॅपवर ३० लाखांचा खर्च का?

sakal_logo
By

लोगो- जिल्‍हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणूक
--
७५३६१

मोबाईल अॅपवर ३० लाखांचा खर्च का?
सचिन जाधव यांचा सवाल; सत्ताधाऱ्यांचा कारभार संशयात

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता.१३: जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या सभासदांसाठी संस्था संचालक मंडळाने मोबाईल ॲपकरिता ३० लाख रुपये खर्च केले आहेत. यात सभासदांची संस्थेकडील असलेली खाती वगळता इतर कोणतीही माहिती नाही. या ॲपमधून सभासदांना व्यवहार करता येत नाहीत. मग या ॲपसाठी ३० लाख रुपये खर्च करण्याचे कारण काय? सत्ताधाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने सभासदांचा पैसा खर्च करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यांच्या या कारभाराची पोलखोल करण्याचा इशारा विरोधी राजर्षी शाहू स्‍वाभिमानी आघाडीचे नेते सचिन जाधव यांनी दिला.
जाधव म्‍हणाले, ‘सोसायटीच्या ॲपमध्ये सेव्हिंग खाते, कर्ज खाते, ठेव खाते आदीचीच माहिती आहे. ही माहिती संस्थेमध्ये अपडेट केल्यानंतरच ॲपवर दिसते. या अॅपचा वापर करुन कोणतेही व्यवहार सभासदांना करता येत नाहीत.
संस्थेकडे यापूर्वी थ्री स्टार इन्फोसिस लि.मार्फत संगणकीय कामकाज केले जाते होते. त्यांच्याकडे संस्‍थेचा संपूर्ण मास्टर डाटा आहे. त्यामुळे सदरची माहिती सभासदांना हप्ता जमा झाल्यानंतर एसएमएसद्वारे कळत असताना पुन्हा मोबाईल ॲप घेण्याचे कारण काय? अॅपव्दारे सभासदांना ऑनलाईन व्यवहार करण्याची सुविधा असती तर त्याताउद्देश सफल झाला असता. सध्या बाजारात अशा प्रकारचे ॲप हे ५ लाख रुपयात मिळतात. मात्र संस्‍थेने यासाठी ३० लाख रुपये खर्च करुन नेमके कोणाचे कल्याण साधले?’

कोट
संस्थेने कोर्ट कामासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास २५ हजार रुपये ठोक मानधनावर नियुक्त केले आहे. त्याचबरोबर कोर्ट कामासाठी पुन्हा वकीलांनाही अंदाजे ५ लाख रुपये फी दिली जाते. त्यामुळे संस्थेवर ३ लाख रुपयांचा अनावश्यक जादाचा खर्च होत आहे. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यास ठोक मानधनावर घेण्यापेक्षा त्याच वेतनामध्ये संस्थेच्या सभासदांच्या एखाद्या पाल्यास नियुक्ती देता आली असती. मात्र जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना टाळले जात आहे. त्यामुळे सभासदांनी सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये.
-सचिन जाधव, पॅनेल प्रमुख, राजर्षी शाहू स्‍वाभिमानी आघाडी