मकर संक्रांतीनिमित्त स्नेहाचा धागा घट्ट होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मकर संक्रांतीनिमित्त
स्नेहाचा धागा घट्ट होणार
मकर संक्रांतीनिमित्त स्नेहाचा धागा घट्ट होणार

मकर संक्रांतीनिमित्त स्नेहाचा धागा घट्ट होणार

sakal_logo
By

मकर संक्रांतीनिमित्त
स्नेहाचा धागा घट्ट होणार
भोगी पारंपरिक उत्साहात; सामाजिक उपक्रमांवरही भर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : मकर संक्रांतीनिमित्त उद्या (रविवारी) स्नेहाचा धागा अधिक घट्ट होणार आहे. नव्या वर्षातील पहिला सण असल्याने संक्रांतीच्या शुभेच्छांची देवाण-घेवाणही आजपासूनच सुरू झाली. बाजारपेठेतही तिळगूळ, सुगडी, गाजर, विविध पर्यावरणपूरक वाणांसह हरभरा आदी साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी राहिली. या सणाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांवरही भर दिला जाणार आहे.
राज्यात यंदापासून मकर संक्रांतीचा सण पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आजपासून बाजरी महोत्सवांना प्रारंभ झाला. या महोत्सवातून पौष्टिक तृणधान्यांची उपयुक्तता आणि एकूणच आरोग्यविषयक जागर होणार आहे. रविवारी सुट्टी दिवशीच हा सण आल्याने यानिमित्ताने तिळगुळ वाटपाबरोबरच सहकुटुंब सेलीब्रेशनही साजरे होणार आहे. प्रयाग चिखली येथील प्रयाग तीर्थ यात्रेलाही प्रारंभ होणार असून पुढे महिनाभर ही यात्रा असेल. त्याची तयारी पूर्ण झाली आहे.
दरम्यान, पारंपरिक उत्साहात आज भोगी साजरी झाली. बाजरीची भाकरी आणि भाजी एकमेकांना देण्याची पूर्वापार चालत आलेली परंपराही यानिमित्ताने जपली गेली.