गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

गडहिंग्लज महाविद्यालयाच्या शिबिराची सांगता
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराची सांगता झाली. हसुरचंपू (ता. गडहिंग्लज) येथे सात दिवस हे शिबिर चालले. शिबिर काळात गावातील स्मशानभूमीचा परिसर, लक्ष्मी मंदिर परिसर, प्राथमिक शाळेचा परिसराची स्वच्छता करण्यात आली. विविध विषयांवर शिबिरार्थींचे प्रबोधन करण्यात आले. जयश्री रावण, भोईटे, सी. व्ही. महाजन, कुलकर्णी, पी. टी. हसुरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाने शिबिराची सांगता झाली. सुमित पाटील, संध्याराणी हुक्केरी, रिना कांबळे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. संगीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस. एस. शिंदे यांनी आभार मानले.
-----------------
गडहिंग्लज हायस्कूलमध्ये विवेकानंद सप्ताह
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूलमध्ये स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहातंर्गत विविध कार्यक्रम झाले. आयर्न मॅन प्रकाश मोरे व आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक अंजू तुरंबेकर यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. अंजू तुरंबेकर म्हणाल्या, ‘‘खेळाबरोबर खूप अभ्यास करा. आरोग्य चांगले ठेवा. आपले ध्येय गाठण्यासाठी खूप मेहनत करा.’’ गणेश लोळगे यांचे ‘शिवाजी महाराज समजून घेताना’ या विषयावर व्याख्यान झाले. शिवाजी महाराजांचे विचार नव्या पिढीत रुजले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सौरभ हिडदुग्गी व प्रज्वल राजगुरु यांनी स्वामी विवेकानंद यांची विदेशातील गाजलेली भाषणे युवकांना प्रेरणा देणारी असल्याचे सांगितले. शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
---------------
क्रिएटिव्ह हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सव
गडहिंग्लज : येथील क्रिएटिव्ह हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. सचिव आण्णासाहेब बेळगुद्री, मुख्याध्यापक दिनकर रायकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल हॉकी या सांघिक खेळासह वैयक्तिक खेळ झाले. ब्ल्यू हाऊसने विजेतेपद पटकाविले, तर ग्रीन हाऊसने उपविजेतेपद मिळविले. क्रीडा शिक्षक नानासाहेब सुतार, पुंडलिक मोहनगेकर, सचिन पोवार, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी नियोजन केले.
--------------
हसुरचंपू शाळेत क्रीडा सप्ताह सुरू
गडहिंग्लज : हसुरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील श्रीमती यशोदाबाई घोरपडे हायस्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाला प्रारंभ झाला. खो-खो स्पर्धेने सप्ताहाची सुरुवात झाली. राजू चौगुले यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन चौगुले यांनी शाळेला प्रथमोपचार पेटी भेट दिली. मुख्याध्यापक ए. एम. शेख, टी. एस. सुतार, एन. ए. गायकवाड, एस. एम. मिश्रीकोटी, एस. एम. कोळी, एम. आय. रॉड्रीक्स, व्ही. एम. नाईक, एस. एस. घस्ती, बी. व्ही. कुट्रे, एस. जे. कांबळे, ए. आर. कांबळे, बी. पी. यादव, ए. एच. पाथरवट उपस्थित होते.
---------------
75587
गडहिंग्लज : जिल्हा सत्र न्यायालयाला दिलेल्या भेटी प्रसंगी किलबिल विद्या मंदिरचे विद्यार्थी व शिक्षक.

किलबिलच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट
गडहिंग्लज : येथील किलबिल विद्यामंदिर व इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट झाली. सहावी ते नववीच्या १५८ विद्यार्थ्यांनी जिल्हा सत्र न्यायालयास भेट दिली. विद्यार्थ्यांनी न्यायालयाचे दैनंदिन कामकाज समजून घेतले. त्यानंतर गडहिंग्लज पोलिस ठाण्याला भेट दिली. पोलिसांचे कामकाज कसे चालते याची माहिती घेतली. प्रश्‍नावली तयार करून त्याची उत्तरे जाणून घेतली. पोलिस उपनिरीक्षक समाधान घुगे, हवालदार रेखा लोहार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक आनंदा घोलराखे, राहुल शेट्टी, दयानंद कुंभार यांच्यासह शिक्षकांनी नियोजन केले.
------------------
‘घाळी’मध्ये जनजागृती व्याख्यान
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात नायलॉन मांजा विरोधी जनजागृती करण्यात आली. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रा. अनिल मगर यांनी पतंग महोत्सवाची सुरुवात कशी झाली यापासून ते सध्या पतंग उडविताना वापरला जाणारा मांजा कशा प्रकारचा आहे याची माहिती दिली. नायलॉन मांजा घातक असल्याने तो न वापरण्याचे आवाहन केले. प्रा. संतोष बाबर यांनी स्वागत केले. डॉ. नीलेश शेळके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अश्विनी गोडघाटे यांनी आभार मानले. डॉ. नागनाथ मासाळ, डॉ. सरला आरबोळे, डॉ. सरोज बीडकर, डॉ. दत्तात्रय वाघमारे, प्रा. महेश पाटील, प्रा. विलास प्रधान आदी उपस्थित होते.