बालाजी विद्यालयात भूगोल दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालाजी विद्यालयात भूगोल दिन
बालाजी विद्यालयात भूगोल दिन

बालाजी विद्यालयात भूगोल दिन

sakal_logo
By

ich159.jpg
75606
इचलकरंजी : बालाजी विद्यालयात भूगोल दिनानिमित्त भौगोलिक मॉडेल्सची मांडणी केली होती.
बालाजी विद्यालयात भूगोल दिन
इचलकरंजी : जागतिक भूगोल दिनानिमित्त विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचे ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध नकाशे, खडकांचे प्रकार, नैसर्गिक प्रदेशांची माहिती, विविध भौगोलिक मॉडेल्स आदींची मांडणी केली होती. विद्यार्थ्यांना चित्रफितीद्वारे भौगोलिक माहिती दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जागतिक तापमान वाढ, त्याची कारणे, परिणाम, पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण, पृथ्वीवर होणारे बदल, सूर्याप्रमाणे अवकाशातील अनेक ताऱ्यांची माहिती, चंद्रावरील हवामान, पृथ्वीची उत्पत्ती, अवकाशातील उपग्रह व अवकाशयाने यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांचा अवकाशीय कचऱ्यामध्ये समावेश होतो. अशा विविध प्रश्नांची भौगोलिकदृष्ट्या माहिती दिली.
---------------------
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
इचलकरंजी : राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल व रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक २७ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा झाला. महाराष्ट्र संस्कृतीचे भारुडं, कोळी, लावणी, धनगर, गोंधळी गीत, शिवबाचे मावळे, मी मराठी, खंडोबा राया नृत्यविष्कारातून सादर केला. त्यासोबत टिटवी, बेडकीची विहीर, आठवणींचा पाऊस, कविता सादर केल्या. अध्यक्षस्थानी मनपाचे सहायक क्रीडाअधिकारी संजय कांबळे होते. पाटलोबा पाटील, विद्याधर भाट, सौ. शेलार, राजेंद्र घोडके, पी. ए. पाटील आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक शंकर पोवार यांनी केले. आभार राजेंद्र घोडके यांनी मानले.
--------------------
बालाजी विद्यालयाचा गौरव
इचलकरंजी : प्रुडेन्स स्कूल अशोक विहार दिल्ली येथे झालेल्या इन्टरनॅशनल रोबोटीक स्पर्धेमध्ये बालाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सादरीकरण केल्याने प्रमाणपत्र देऊन गौरवले. स्पर्धेमध्ये ईश्वर सुखटणकर, सिद्धवेद साळुंखे, चिन्मय पाटील, प्रज्वल परीट यांनी सादरीकरण केले होते. स्पर्धेमध्ये मध्यप्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, छत्तीसगड, केरळ, हिमाचलप्रदेश, गुजरात, व उत्तराखंड या राज्यांमधील १२० शाळांनी सहभाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे ज्‍येष्ठ शिक्षक व विज्ञानविभागप्रमुख आर. ए. नाईकवाडे, ए. एस. डाकरे, आर. एस. काळे यांचे मार्गदर्शन लाभले.
------------------
आंतरभारती विद्यालयात भूगोल दिन
इचलकरंजी : आंतरभारती विद्यालयात भूगोल विषयप्रमुख एस. व्ही. नेवसे यांनी भूगोल विषयाचे महत्त्व विशद केले. त्याचबरोबर भूगोल विषयासंबंधित तक्त्यांची मांडणी केली होती. विद्यार्थिनींनी ‘वसुंधरा गीत’ सादर केले. मीनाक्षी जावळे हिने मनोगत व्यक्त केले. आर. बी. परीट यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक एम. डी. पाटील, व्ही. सी. फाटक आदी उपस्थित होते. के. बी. शिंदे यांनी आभार मानले.
----------------
ich158.jpg
75605
इचलकरंजी : मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
व्यंकटराव हायस्कूलचे यश
इचलकरंजी ः बालेवाडी (पुणे) येथे आयोजित मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. प्रशालेचे आजी माजी २० खेळाडूंनी रोईंगमध्ये ७ सुवर्ण, ३ कांस्य तर वेटलिफ्टिंगमध्ये २ सुवर्ण व १ रौप्य पदक प्राप्त केले. यशस्वी खेळाडूंचा सत्कार शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्याहस्ते केला. कौशिक मराठे, मुख्याध्यापक ए. ए. खोत, उपमुख्याध्यापिका ए. एम. कांबळे, एम. एस. खराडे, जे. ए. कोळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ए. डी. दाभोळे यांनी केले. आभार व्ही. एस. माळी यांनी मानले.
--------------------
विद्युत खांब दुरुस्तीची मागणी
इचलकरंजी : शहरातील अलायन्स हॉस्पिटलजवळ दहा फुटी रस्त्याशेजारी असलेल्या महानगरपालिकेचे पथदिवे खांब एका बाजूस झुकलेल्या अवस्थेमध्ये आहेत. त्याची तत्काळ दुरूस्ती करावी या मागणीचे निवेदन गणेश लायकर यांनी महानगरपालिकेस दिले आहे.
---------------------
जयप्रकाश छाजेड यांना श्रद्धांजली
इचलकरंजी : माजी आमदार आणि महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांना इंटक भवनमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. कामगार लढ्यात सातत्याने मोलाची भूमिका घेत इंटकचे नेतृत्व केले. त्यातून लाखो कामगारांना दिलासा दिला. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटूंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे उद्‌गार महाराष्ट्र इंटकचे सेक्रेटरी शामराव कुलकर्णी काढले. अध्यक्षस्थानी शिवाजीराव भोसले होते.