सर्किट बेंच धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्किट बेंच धाव
सर्किट बेंच धाव

सर्किट बेंच धाव

sakal_logo
By

फोटो- 75774
.....

कोल्हापुरातील खंडपीठासाठी डोळे बांधून धाव

प्रसाद जाधव यांनी वेधले मुंबईकरांचे लक्ष

कोल्हापूर, ता. १५ ः मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सहा जिल्ह्यांकरिता कोल्हापूर येथे स्थापन व्हावे, या मागणीसाठी सिटिजन
फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत डोळ्याला काळी पट्टी बांधून धाव घेतली.
सहा जिल्ह्यांकरिता खंडपीठ कोल्हापुरात होण्याकरिताचा लढा गेली ३७ वर्षे सुरू आहे. कोल्हापूर येथे खंडपीठ होण्याकरिता लागणारे सर्व निकष पूर्ण झाले आहेत, तरी देखील शासन व न्यायव्यवस्था यांच्याकडून डोळेझाक केली जात आहे. याकरिता सहा जिल्ह्यांतील एक सर्वसामान्य नागरिक या नात्याने जाधव यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय महामॅरेथॉनमध्ये डोळ्याला काळी पट्टी बांधून धाव घेतली.
‘वुई वॉन्ट हायकोर्ट बेंच’ अशा आशयाचा बनियन त्यांनी परिधान केला होता. त्यामुळे त्यांच्या या अनोख्या मागणीने कोल्हापूर खंडपीठ मागणीचा प्रश्न मुंबई आंतरराष्ट्रीय महामॅरेथॉनमध्ये लक्षवेधी ठरला. जाधव यांनी यावेळी महा मॅरेथॉनमध्ये हायकोर्ट मुंबई या परिसरात देखील डोळ्याला काळी पट्टी बांधून धाव घेतली व कोल्हापुरात खंडपीठ झाले पाहिजे, अशा घोषणा दिल्या.
..........