Thur, Feb 9, 2023

आजरा ः पोलीस वृत्त
आजरा ः पोलीस वृत्त
Published on : 15 January 2023, 4:32 am
स्फोटक पदार्थ खाल्याने कुत्र्याचा मृत्यू
आजरा ः खेडगे (ता. आजरा) येथे स्फोटक पदार्थ खाल्ल्याने कुत्र्याचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद आजरा पोलिसांत शिवाजी गोपाळ शेटगे यांनी दिली आहे. अज्ञाताविरोधात पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे. शेटगे यांनी रॉकी नावाचा कुत्रा व्हरांड्यात बांधला होता. त्याला कोणीतरी अज्ञात इसमाने स्फोटक पदार्थ खाण्यास दिला. तो खाल्ल्याने त्याचा जबडा फाटला व त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिस हवालदार दता शिंदे अधिक तपास करीत आहेत.