राष्ट्रवादीचे पत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीचे पत्रक
राष्ट्रवादीचे पत्रक

राष्ट्रवादीचे पत्रक

sakal_logo
By

सोमय्यांचे स्वागतच, मुश्रीफांच्या कामाची माहिती घ्या

शहर राष्ट्रवादीचे पत्रक ः मुश्रीफ गोरगरिबांचे नेते, त्यांचे कार्य मोठे

कोल्हापूर, ता. १५ ः भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे कोल्हापुरात स्वागतच आहे. मात्र, त्यांनी टीकाटिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोपाच्या पलीकडे जाऊन आमदार हसन मुश्रीफ यांच्या कार्याचीही माहिती घ्यावी, असे पत्रक शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रसिद्धीस दिले आहे.
आमदार मुश्रीफ हे गोरगरिबांचे आणि बहुजनांचे नेते आहेत. गोरगरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी उभी हयात खर्ची घातलेली आहे. त्यामुळेच त्यांच्याप्रती आमच्या उच्च कोटीच्या आदराच्या भावना आहेत. आमच्या भावनांना ठेच पोहोचवू नका. सोमय्यांच्या तक्रारीनुसार केंद्रीय तपास यंत्रणा तपास करीत आहेत. तो तपास सुरूच राहू दे. त्या तपासातून काय निष्पन्न व्हायचे ते होऊ दे. परंतु, आमदार मुश्रीफ यांच्याबद्दल चुकीचे आरोप करून आमच्या भावना दुखावू नका, असा इशाराही या पत्रकात दिला आहे.
मुश्रीफ यांनी सर्वच शासकीय योजना गावागावांपर्यंत, वाड्या-वस्त्यांवर आणि गोरगरिबांच्या झोपड्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत. देशात एक नंबरचे काम या माध्यमातून त्यांनी केलेले आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून वैद्यकीय उपचारांची आरोग्यसेवा तर जगजाहीरच आहे, त्याचीही माहिती घ्या असे पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकावर शहराध्यक्ष आर. के. पोवार, आदिल फरास, राजू लाटकर, उत्तम कोराणे, आसिफ फरास, अजित राऊत, प्रकाश गवंडी, प्रकाश पाटील, सचिन पाटील, संदीप कवाळे, विनायक फाळके, परीक्षित पन्हाळकर, रमेश पवार आदींच्या सह्या आहेत.
.........