
हज फाऊंडेशन मायेची उब
75871
...
हज फौंडेशनच्या वतीने
फिरस्त्यांना मिळाली मायेची ऊब
कोल्हापूर ः शहरात पारा १४ डिग्री सेल्सिअसच्या खाली आला आहे. रक्त गोठवणाऱ्या थंडीने नागरिक गारठून गेले आहेत. रस्त्यावरचे फिरस्ते सुद्धा या थंडीने कुडकुडत रात्र काढत आहेत. फिरस्त्यांची ही अवस्था पाहून हज फौंडेशनच्या वतीने त्यांना उबदार ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसर, रेल्वे स्टेशन, सीपीआर हॉस्पिटल परिसर, मराठा बँक परिसर, शिवाजी महाराज चौक, बिंदू चौक, अंबाबाई मंदिर परिसरात कडाक्याच्या थंडीत कुडकुडत झोपलेल्या फिरस्त्यांना विशेष करून वयस्कर महिला आणि पुरुषांना ब्लॅंकेट दिली गेली. हज यात्रेकरूंची सेवा करणाऱ्या हज फौंडेशनने सामाजिक कार्य म्हणून हा उपक्रम राबविला. यावेळी हज फौंडेशनचे अध्यक्ष समीर मुजावर, उपाध्यक्ष हाजी बालेचांद म्हालदार, खजानिस हाजी अस्लम मोमीन, सदस्य हाजी समीर पटवेगार, यासीन उस्ताद उपस्थित होते. हाजी मुबारक मुल्लाणी यांचे सहकार्य मिळाले.