भारती विद्यापीठ फार्मसीला एन. बी. ए. पुनर्मांनाकन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारती विद्यापीठ फार्मसीला एन. बी. ए. पुनर्मांनाकन
भारती विद्यापीठ फार्मसीला एन. बी. ए. पुनर्मांनाकन

भारती विद्यापीठ फार्मसीला एन. बी. ए. पुनर्मांनाकन

sakal_logo
By

भारती विद्यापीठ फार्मसीला
एन. बी. ए. पुनर्मांनाकन
कोल्हापूर : नवी दिल्लीतील राष्ट्रीय मुल्यमापन समितीकडून भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीला सलग तिसऱ्यांदा ‘एन.बी.ए’चे पुनर्मांनाकन मिळाले. एन.बी.ए. समितीने १५ ऑक्टोबर २०२२ रोजी महाविद्यालयास भेट दिली होती. या समितीत प्रा. डॉ. बी. पी. श्रीनिवासन (दिल्ली) यांनी अध्यक्ष, तर डॉ. किशन वारंगळ यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. समितीकडून ओबीई तत्वावर आधारीत विद्यार्थ्यांचा विकास, उच्च शिक्षण व संशोधन कामकाज, इमारत, प्रयोगशाळा, संगणक विभाग, इंटरनेट, ग्रंथालयातील नियतकालिके, ऑनलाईन नियतकालिकांचे मुल्यमापन केले. महाविद्यालयास मिळालेले चाळीस पेटंटस, १००० हून अधिक प्रकाशित संशोधन पेपर्स, शोधनिबंध, शिक्षकांची दहा प्रकाशित पुस्तकांची दखल घेतली. शिवाजी विद्यापीठ फार्मसी कार्यक्षेत्रात ‘एन.बी.ए.’चे तिसऱ्यांदा पुनर्मांनांकन मिळालेले कॉलेज ऑफ फार्मसी हे एकमेव आहे. प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे यांच्या नेतत्वाखाली महाविद्यालयाने वेगळा ठसा उमटवला आहे. उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटीया, उपप्राचार्य डॉ. एन. आर. जाधव, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
------------