टीपी हालचाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीपी हालचाल
टीपी हालचाल

टीपी हालचाल

sakal_logo
By

कर्मचारी कार्यालयात नाहीत,
रजिस्टरमध्येही नोंद नाही!
नगररचना कार्यालयातील स्थिती
कोल्हापूर, ता. १६ ः कार्यालयीन कामासाठी फिरतीवर असाल, तर हालचाल रजिस्टरमध्ये नोंद केली जाते; पण आज हालचाल रजिस्टरमध्ये कुठे गेल्याची नोंद नाही व कार्यालयातही नाहीत, अशी स्थिती नगररचना कार्यालयात होती. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी नागरिकांना अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करत बसावे लागले.
नगररचना कार्यालयात अधिकारी, कर्मचारी भेटत नाहीत, अशी नागरिकांची तक्रार असते. त्यामुळे प्रशासकांनी एक दिवस महापालिकेच्या मुख्य इमारतीऐवजी या कार्यालयात जाऊन गाऱ्हाणी ऐकण्याचे ठरवले; पण इतर दिवशी परिस्थिती ‘जैसे थे’ रहात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी आज दाखवून दिले. आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने अधिकारी, कर्मचारी भेटतील, अशी अपेक्षा ठेवून नागरिक कार्यालयात आले होते; पण साडेतीनच्या सुमारास कार्यालयात अनेकजण उपस्थित नसल्याचे शेख यांना दिसून आले. हालचाल रजिस्टरमध्ये पाहिल्यानंतर सहा जणांची नोंद दिसून आली. इतरांची काही नोंद नव्हती. त्यामुळे बरेच नागरिक अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करत कार्यालयात थांबून होते. त्यातच लिफ्ट बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना अधिकारी आले की नाहीत हे पाहण्यासाठी पायऱ्या चढण्याचा वेगळाच त्रास सहन करावा लागत होता.