
वितरण- भारती विद्यापीठ
भारती विद्यापीठ इंग्लीश
स्कूलमध्ये विविध कार्यक्रम
कोल्हापूर, ता. १६ : भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त भारतीय विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध कार्यक्रम झाले. करुणालय बालसुधारगृह आणि एकटी संस्था संचलित शहरी बेघर पुरुष निवारण केंद्रामध्ये ‘एक मुठ धान्य समाजासाठी’ या उपक्रमांतर्गत विविध धान्य व जीवनावश्यक साहित्य देण्यात आले.
आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत चारशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. वक्तृत्व स्पर्धेलाही मोठा प्रतिसाद मिळाला. सातवीच्या विद्यार्थ्यांनी ‘आजच्या पिढीला सोशल मीडियाचा वेढा’ या विषयावरती कदमवाडी परिसरात पथनाट्य सादर केले. पालकांसाठी रांगोळी स्पर्धाही झाली. ‘कोरोनानंतर मुलांच्या मानसिकतेमध्ये होणारे विविध बदल आणि त्यावरील उपाय योजना‘ या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉ. उत्तम गव्हाणे यांचे व्याख्यान झाले. शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब पाटील, माधुरी जगताप आणि रमा प्रभूगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाले.