Sat, Jan 28, 2023

ओम सहकारी गृहनिर्माण
ओम सहकारी गृहनिर्माण
Published on : 16 January 2023, 7:05 am
ओम संस्थेबाबत आज सुनावणी
कोल्हापूर : येथील ओम सहकारी गृहनिर्माण संस्थेकडून मूळ सभासद यादीमध्ये बदल केला आहे. हा बदल करताना शासकीय नियमांचा शर्तभंग केला आहे. नवीन सभासद करून सदनिका दिली आहे. तसेच याच जागेत स्वतंत्र बांधकाम केल्याचे निदर्शनास येत असून या संस्थेला जागा मंजुरीचा आदेश रद्द करावा, अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली होती. त्यानुसार उद्या (ता. १७) सकाळी ११ ला याबद्दल अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात सुनावणी घेतली जाणार आहे. दरम्यान, या संस्थेचा पदाधिकारी किंवा सचिव उपस्थित न राहिल्यास ही जमीन सरकार जमा केली जाईल, असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिला आहे.