चिले महाराज पालखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिले महाराज पालखी
चिले महाराज पालखी

चिले महाराज पालखी

sakal_logo
By

76124
कोल्हापूर : ‘ओम दत्त चिले’च्या अखंड गजरात मंगळवारी शहरातून चिले महाराजांचा पायी पालखी सोहळा सजला. त्यात मोठ्या संख्येने सहभागी झालेले भाविक. (बी. डी. चेचर : सकाळ छायाचित्रसेवा)

अमाप उत्साहात
चिले महाराज पालखी सोहळा
टेंबलाई टेकडीहून आज वाठारकडे प्रस्थान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : ‘ओम दत्त चिले ओम.’चा अखंड गजर आणि ‘रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात...’ असे आनंदगीत गात आज चिले महाराजांच्या पालखीचे शहरात जोरदार स्वागत झाले. भजन, रांगोळ्या, फुलांच्या पायघड्यांबरोबरच भव्य पोस्टर्स आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात हा सोहळा सजला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचगंगा घाटावरून सकाळी अकराच्या सुमारास सोहळ्याला प्रारंभ झाला. माजी आमदार सुरेश साळोखे, राजू मेवेकरी, मिलिंद धोंड, निवृत्त पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, माजी महापौर माधवी गवंडी, उत्तम निगवेकर, शिवाजी जाधव, संजय घाटगे, अनिल पाटील, कीर्ती साळोखे आदी या वेळी उपस्थित होते.
पंचगंगा घाट, गंगावेस, रंकाळा स्टॅंड, तटाकडील तालीम, अंबाबाई मंदिर, जोतिबा रोड, भवानी मंडप, बिंदू चौक, दत्त भिक्षालिंग मंदिर, बागल चौकमार्गे सायंकाळी पालखी टेंबलाईवाडी येथील त्र्यंबोली मंदिरात मुक्कामाला आली. कपिलतीर्थ मार्केट परिसरात या सोहळ्याच्या निमित्ताने चिले महाराजांचे चाळीस फुटी भव्य पोस्टर उभारले. उद्या (बुधवारी) सकाळी टेंबलाई टेकडीहून पालखीचे प्रस्थान होणार असून, टोपमार्गे वाठार येथील हनुमान मंदिरात पालखी मुक्कामास जाईल. रविवारपासून श्रीक्षेत्र जेऊर येथून सोहळ्याला प्रारंभ झाला असून, २७ जानेवारीला मोर्वे दत्त मंदिर संस्थान येथे काल्याचे कीर्तन होऊन पालखी सोहळ्याची सांगता होईल.