स्टार्ट अप एक्स्पो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टार्ट अप एक्स्पो
स्टार्ट अप एक्स्पो

स्टार्ट अप एक्स्पो

sakal_logo
By

76284
इचलकरंजी ः येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मार्गदर्शन करताना सौरभ भोसले. समोर उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनी.
76291
तुषार कामत
76294
सायली पद्माळे

स्‍टार्टअप एक्स्पोअंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद
शरद इन्स्टिट्यूट, विवेकानंद, सायबर कॉलेजमध्ये कार्यक्रम; सकाळ माध्यम प्रायोजक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : स्टार्टअप फेस्टिव्हलअंतर्गत आज जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद झाला. शरद इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (इचलकरंजी), विवेकानंद कॉलेज व छत्रपती शाहू इन्स्टिटयूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च (सायबर) या महाविद्यालयात स्टार्टअपप्रमुखांनी मार्गदर्शन केले. ‘स्टार्ट टेक’चे संस्थापक सौरभ भोसले, हेल्थकेअर झोनच्या संस्थापक सायली पद्माळे, केनस्टार ॲग्रोचे संस्थापक तुषार कामत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान, या उपक्रमाचे सकाळ माध्यम प्रायोजक आहे.
सौरभ भोसले यांनी शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्टार्टअपचे महत्त्व, त्यांनी स्वतः स्टार्टअप सुरू करतानाचा प्रवास व जे अडथळे त्यांनी पार केले त्याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. त्यांनी निर्माण केलेल्या एका इनोव्हेशनवरही संवाद रंगला. सायली यांनी वारणानगर येथे फार्मसीचे शिक्षण घेत असताना, ग्रामीण भागातल्या आरोग्याच्या समस्या जाणून घेऊन आपला स्वतःचा स्टार्टअप कसा सुरु केला, याबाबतचा प्रवास विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर उलगडला. तुषार कामत यांनीही आपल्या स्टार्टअप संबंधीचा प्रवास शेअर केला. ‘केनस्टार’ने आतापर्यंत केलेल्या इनोव्हेटिव्ह ऑरगॅनिक गुळाचे प्रकार व उत्पादनाविषयीची माहिती त्यांनी दिली. आरजे मनीष यांनी आयडिया बॉक्सची संकल्पना सांगितली. या वेळी शरद इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजीचे सुमित बर्डिया, विवेकानंद कॉलेजचे डॉ. संजय अंकुशराव, ‘सायबर’चे डॉ. विनायक साळोखे, डॉ. सिद्धयानी पोखले, ओपेक्स स्टार्टअप स्कूलचे सचिन कुंभोजे व अंजोरी परांडेकर-कुंभोजे उपस्थित होते.