
रस्ता उखडला
76363
राजारामपुरीतील रस्ता
एकदिवसात उखडला
कोल्हापूर : राजारामपुरीत शनिवारी केलेल्या रस्त्यावरील खडी एका दिवसात उखडली. डांबराचे प्रमाण कमी असल्याने उखडलेल्या खडीमुळे काही दुचाकीस्वार घसरून पडले. त्यामुळे महापालिकेच्या रस्ते कारभाराचा आणखी एक नमुना शहरवासीयांसमोर आला आहे.
राजारामपुरीतील मारूती मंदीर ते माऊली चौक दरम्यान रस्ता शनिवारी पेव्हर पद्धतीने पॅचवर्क केले होते. हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे. तिथून दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. डांबरीकरणाच्या कामाला अवघा एक दिवसच झाला. सोमवारी त्या केलेल्या रस्त्यावरील संपूर्ण खडी उखडली. त्यामुळे प्रथम अनेकांना रस्त्यासाठी खडी पसरली असल्याचे वाटले. पण ती रस्त्यातीलच असल्याचे समजल्याने अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ॲड. बाबा इंदूलकर यांनी तक्रार केल्यानंतर खडी उचलण्यासाठी महापालिकेने कर्मचारी लावले. मोठ्या प्रमाणावर खडी बाजूला काढण्यात आली. या कामात डांबराचे प्रमाण कमी असल्याने खडी उखडल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले.
काल रात्री काही दुचाकीस्वार त्या खडीवरून घसरून पडले. या प्रकारामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.