माई बाल विद्या मंदिरात हळदी कुंकू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माई बाल विद्या मंदिरात हळदी कुंकू
माई बाल विद्या मंदिरात हळदी कुंकू

माई बाल विद्या मंदिरात हळदी कुंकू

sakal_logo
By

माई बाल विद्यामंदिरात हळदी-कुंकू
इचलकरंजी : माई बाल विद्यामंदिरात माता-पालकांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम व व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी डॉ. विजया पोतदार यांनी पालकांनी मुलांचे आरोग्य कसे सांभाळावे, मुलांचा सकस आहार कसा असावा, मुलांसाठी खेळ-व्यायाम, तसेच त्यांच्या सवयीबाबत मार्गदर्शन केले. तसेच पालकांच्या विविध शंकांचे निरसन केले. निर्मला ऐतवडे, माधुरी मर्दा, मीना तोसनीवाल, निकिता शहा, सुनीता सूर्यवंशी, डॉ. दीपा चौगुले, डॉ. किर्ती कुलकर्णी, स्मिता चौगुले उपस्थित होत्या. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका शैला कांबरे यांनी केले.
------------------
चौगले विद्यामंदिरमध्ये पारितोषिक वितरण
इचलकरंजी : कै. डॉ. जया आदिनाथ चौगले प्राथमिक विद्यामंदिर, आदिनाथ पिराप्या कंटकाळे बालमंदिर व शिशुगटातर्फे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा समारंभ पी. जे. बडबडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी अष्टपैलू विद्यार्थी, गुणी विद्यार्थी चॅम्पियनशिप व बाह्य स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. इंदुमती केटकाळे, दीपा मानधना, रुपाली होगाडे, अनिल खोत, सी. डी. लडगे, तीर्थकर माणगावे, रवींद्र पाटील, मुख्याध्यापिका वर्षा हुल्ले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन करून आभार तानाजी कांबळे यांनी मानले.
-------------
विनायक हायस्कूलचे पारितोषिक वितरण
इचलकरंजी : विनायक हायस्कूलचा पारितोषिक वितरणाचा समारंभ सुमन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमाचे उद्‌घाटन श्रीनिवास भट्टड, तर दीपप्रज्वलन अॅड. राहुल महाजन यांच्या हस्ते झाले. विविध शासकीय क्रीडा स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर शाळा अंतर्गत घेतलेल्या विविध सांघिक व वैयक्तिक स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी लक्ष्मीकांत भट्टड, राजाराम बोंगार्डे, अशोक पाटणी, प्रज्ञा बाकलीवाल, अनिल बम्मन्नावर, चंद्रशेखर बिरादार, प्रेमा पाटनी, कणकशी भट्टड, विनायक चव्हाण, केदारी बासरीकट्टी, ब्रह्मानंद कुंभार उपस्थित होते. आभार शाम कांबळे यांनी मानले. सूत्रसंचालन मिनाज पटेल यांनी केले.