Thur, Feb 9, 2023

शिक्षणात आत्मरक्षणाचे धडे देण्याची मागणी
शिक्षणात आत्मरक्षणाचे धडे देण्याची मागणी
Published on : 19 January 2023, 12:52 pm
gad186.jpg
76471
गडहिंग्लज : शिक्षणात आत्मरक्षणाचे धडे देण्याबाबतचे निवदेन दिनेश पारगे यांना देताना भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनचे पदाधिकारी.
----------------------------
शिक्षणात आत्मरक्षणाचे
धडे देण्याची मागणी
गडहिंग्लज : सध्या देशात आणि राज्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विनयभंग, छेडछाड व बलात्काराचे प्रमाण वाढलेले दिसून येते. त्यामुळे मुली-महिलांना स्वत:चे संरक्षण करण्याचे सामर्थ्य मिळण्यासाठी शालेय शिक्षणात आत्मसंरक्षणाचे धडे द्यावेत, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनातर्फे केली आहे. तहसीलदारांना याबाबतचे निवेदन दिले आहे. तहसीलदार दिनेश पारगे यांनी निवेदन स्वीकारले. तालुकाध्यक्ष समीर पाटील, महिला अध्यक्षा सपना शिवगोंडे, उपाध्यक्षा शोभा हेळवाडकर, प्रेमा पाटील, अंकिता पाटील, श्रीधर पाटील यांनी हे निवेदन दिले.