
कोल्हापूर
76552 ( फोटो ओव्हरसेट)
कोल्हापूर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे महिला विभागांची उद्योगाबाबत बैठक झाली. यावेळी उपस्थित महिला व पदाधिकारी.
महिला उद्योगाबाबत मार्गदर्शन
कोल्हापूर ः सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे कोल्हापूर रिजन महिला विभागांची बैठक शाहू स्मारक भवन येथे झाली. ३७ मेंबर व १७ नवीन उद्योजिका उपस्थित होत्या. महिलांनी व्यवसायाचा परिचय करून दिला व व्यवसायासाठी लागणारी मदत सर्वांसमोर मांडली व नव उद्योजक महिलांना उद्योग, व्यवसयांसाठी मदत देण्याचा प्रयत्न महिला उद्योजकांनी केला. व्यवसाय वाढीसाठी क्लबची कशी मदत होते, सरकारच्या महिला व्यवसायिकांसाठी अनुदानाच्या सवलतींचे मार्गदर्शन कोल्हापूर विभाग प्रमुख विशाल मंडलिक, महिला प्रमुख प्रेमा चौगुले यांनी सांगितले. पूनम शहा, सुषमा धर्माधिकारी, आशा माळी आदी उपस्थित होत्या. केतकी बंकापुरे यांनी सूत्रसंचालन केले.