इचलकरंजीत रविवारी पत्रलेखक मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत रविवारी पत्रलेखक मेळावा
इचलकरंजीत रविवारी पत्रलेखक मेळावा

इचलकरंजीत रविवारी पत्रलेखक मेळावा

sakal_logo
By

इचलकरंजीत रविवारी पत्रलेखक मेळावा
पाच जिल्ह्यातून राहणार उपस्थिती; पुरस्कार वितरणसह `लोकजागर` स्मरणिका प्रकाशन
इचलकरंजी, ता. १८ ः येथील वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्यावतीने येत्या रविवारी (ता. २२) रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सकाळी दहा वाजता वृत्तपत्र पत्रलेखक मेळावा आयोजीत केला आहे. समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात हा मेळावा होणार आहे. मेळाव्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व बेळगाव जिल्ह्यातून सुमारे दीडशेहून अधिक पत्रलेखक उपस्थीत राहणार आहेत. याबाबतची माहिती अध्यक्ष पांडुरंग पिसे व सचिव मनोहर जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ विचारवंत प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस उपस्थीत राहणार आहेत. अध्यक्षस्थान दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील भूषवणार आहेत. यानिमित्ता ‘लोकजागर’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यभरातील सुमारे शंभरहून अधिक पत्रलेखकांचा थोडक्यात परिचय करुन दिला आहे. पत्रलेखनाला चालना मिळावी, यासाठी दर महिन्यातील एका प्रबोधनपर लेखन असेलल्या पत्राची निवड केली आहे. त्यानुसार गेल्या वर्षभरातील १२ सर्वोत्कृष्ट पत्रांची निवड केली असून संबंधित पत्रलेखकांना आचार्य शांतारामबापू गरुड पत्रलेखन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी पत्रलेखकांचा मेळावा घेण्यात येतो. यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे मेळावा व्यापक प्रमाणात घेण्यात येत आहे. त्याची जय्यत तयारी केली आहे, असे श्री. पिसे व श्री. जोशी यांनी सांगीतले.
संस्थेच्या पंचवीस वर्षातील कार्याचा श्री. पिसे व श्री. जोशी यांनी आढावा घेतला. ते म्हणाले, ‘ज्येष्ठ विचावंत आचार्य शांतारामबापू गरुड यांच्या प्रेरणेतून वृत्तपत्र पत्रलेखक संघाची स्थापना केली आहे. पंचवीस वर्षे अखंडपणे कार्यरत असलेली महाराष्ट्रीतील ही एकमेव संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत विविध उपक्रम राबवले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पत्रलेखन कार्यशाळ, पत्रलेखन पुरस्कार, पत्र कात्रण प्रदर्शन, रक्तदान शिबीर, रुग्णांना फळवाटप, प्रबोधनात्मक व्याख्याने आदी उपक्रम घेण्यात आले आहेत. नवोदित पत्रलेखकांसाठी प्रेरणास्थान म्हणून आमच्या संस्थेकडे पाहिले जाते.
पत्रकार परिषदेसाठी प्रसाद कुलकर्णी, संजय भस्मे, अभीजीत पटवा, महेंद्र जाधव, दीपक पंडीत, सचिन कांबळे, बाळासाहेब नरशेट्टी, रमेश सुतार आदी उपस्थीत होते.
----------
बारा पत्रलेखकांचा होणार गौरव
तात्यासाहेब काटकर (आनंदनगर, अकलूज), गणेश लेंगरे (बाळे, सोलापूर), किरण धुमाळ (अकलूज), डाॅ.जे.डी. म्हेत्रे (कवठे महांकाळ), बाळासाहेब पाटील (विटा), मिलींद यादव (कोल्हापूर), भावना शेडबाळे (जयसिंगपूर), रमेश ठोके (इचलकरंजी), राजू जाधव (मांगूर), राजबाबू शेख (रुकडी), गायत्री अघोर (सोलापूर), अशोक म्हमाणे (सोलापूर).