
दुंडगेत युवकाची आत्महत्या
gad1811.jpg : सुमेध पाटील 76599
दुंडगेत युवकाची आत्महत्या
गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथे एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुमेध सोमगोंडा पाटील (वय २१) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. मंगळवारी (ता. १७) सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. पोलिसांनी सांगितले की, सुमेध हा निडसोशी येथे बी. ई.च्या शेवटच्या वर्षात शिकत होता. शिक्षण घेत तो शेतीकामातही मदत करायचा. मंगळवारी सकाळी आई, वडील दोघेही कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी झोपण्यासाठी जातो, असे आजोबांना सांगून तो पोटमाळ्यावर गेला. दरम्यान, काही वेळानंतर त्याला उठवण्यासाठी गेलेल्यांना तो गळफास लावून घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.