इटकरे ः आशियायी महामार्ग लेखमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इटकरे ः आशियायी महामार्ग लेखमाला
इटकरे ः आशियायी महामार्ग लेखमाला

इटकरे ः आशियायी महामार्ग लेखमाला

sakal_logo
By

विकासाचा ‘आशियाई‘ मार्ग- भाग ४

74663
वाघवाडी फाटा ः येथे महामार्गावरील चौकात चारही दिशेला जाणाऱ्या वाहनांची अशी कोंडी होते.

वाघवाडी फाट्यावर अपघातांचा ताण
आठवड्यात किमान ३-४ लहान मोठे अपघात ठरलेले

दीपक पवार ः सकाळ वृत्तसेवा
इटकरे, ता. १८ ः राष्ट्रीय महामार्गाच्या २००५ मध्ये झालेल्या चौपदरीकरणात रहदारीने गजबजलेल्या वाघवाडी फाट्यावर ''उड्डाणपूल का बांधला नाही '' हा प्रश्न परिसरातील नागरिकांना आजही पडला आहे. आष्टा-इस्लामपूरहून प्रवासी वाघवाडी येथील महामार्ग ओलांडून पुढे लाडेगाव, चिकुर्डे, वारणानगर तर उजव्या बाजूस रेठरे धरण-शिराळा अशी दुहेरी ये-जा करतात. या चौकात आठवड्यात किमान ३-४ लहान मोठे अपघात घडतात. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सेवाभावी संस्थांनी येथे रुग्णवाहिकाच ठेवली आहे.
वाळवा-शिराळा लोकप्रतिनिधींनी हा विषय सातत्याने विधिमंडळात मांडला. आंदोलकांना कोणतेही आंदोलन याच चौकात करणे सोईचे वाटते. कारण येथे चारही बाजूंनी वाहतूक रोखून प्रशासनाची कोंडी करता येते. हे लक्षात घेऊन प्राधिकरणाने उड्डाणपूलाचे नियोजन केले आहे. वीस बाय साडेपाच मीटर मार्गिकेचा उड्डाणपुल होणार आहे. त्यामुळे मुख्य व स्थानिक वाहतूक विनाअडथळा होईल. येथून पाच किलोमीटरवर कामेरी आहे. तेथे दोन्ही बाजूस उड्डाणपूल व भुयारी मार्ग आहेत. यामुळे पादचारी अपघात प्रमाण कमी आहे. पूर्वेकडील थांब्याठिकाणी संपादित जागेत अनेक व्यवसाय सुरू आहेत. त्यांना प्रशासनाने जागा खाली करण्यास सांगितले आहे.
येलूर फाट्यावरही धोकादायक रोड क्रॉसिंग आहे. येथून अर्धा किलोमीटरवर भुयारी मार्ग आहे, मात्र नागरिक त्याचा वापर करीत नाहीत. ''शॉर्टकट'' च्या नादात महामार्ग ओलांडताना संकट ओढावून घेतात. त्याने सातत्याने अपघात घडतात. जीव गमावलेले किंवा इजा झालेले बहुतांश नागरिक येलूर, इटकरे येथील आहेत. आता येथेही २० मीटर बाय साडेपाच मीटरची मार्गिका असणारा उड्डाणपूल होणार आहे.

तीन पदरी पूल होणार...
तांदूळवाडी येथील दोन उड्डाणपूल स्थानिक वाहतुकीच्या वापरात आहेत. मालेवाडी, बहादूरवाडी, कोरेगाव, बागणी, कुंडलवाडी, ऐतवडे खुर्दकडे होणारी वाहतूक त्याखालून होते. उड्डाणपूल संपताच कोल्हापूर दिशेकडे गुरव पूल येथे महामार्गावर वारणा नदीच्या पुराचे पाणी येते. तेथे रस्त्याची उंची वाढणार आहे. कणेगाव फाट्यावर नवीन उपाययोजना नाही. येथील वारणा नदीवर ब्रिटिशकालीन पूल आहे. पूर काळात वाहतुक बंद असते. आता तेथे तीन पदरी पूल होईल.