Thur, Feb 9, 2023

कोविशिल्ड उपलब्ध
कोविशिल्ड उपलब्ध
Published on : 19 January 2023, 2:46 am
कोविशिल्ड लस पालिकेच्या
आरोग्य केंद्रात उपलब्ध
कोल्हापूर : कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनेअतंर्गत शासनाकडून महापालिकेस कोविशिल्ड लशीचा पुरवठा झाला आहे. महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध दुसरा डोस, तसेच बूस्टर डोससाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचे या आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. शहरात १८ वर्षांवरील आजअखेर ६८६५१ लाभार्थ्यांना बूस्टर डोस दिला आहे. १६ मार्च २०२२ पासून १२ ते १४ वयोगटातील मुलांना कार्बोव्हॅक्स लशीचा पहिला डोस चालू केला आहे. कोविशिल्ड लशीचा साठा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. त्या ठिकाणी जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. लसीकरणासाठी येताना आधारकार्ड व फोटो ओळखपत्र असलेले कोणतेही ओळखपत्र घेऊन यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.