शौमिका महाडिक आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शौमिका महाडिक आरोप
शौमिका महाडिक आरोप

शौमिका महाडिक आरोप

sakal_logo
By

पंचवीस वर्षांचा कारभार काढण्यापासून
अडवल नाही ः शौमिका महाडिक

वैयक्तिक खुन्नस ठेवून संघाची बदनामी

कोल्हापूर, ता. १९ : तुमची सत्ता आहे. 25 वर्षातला कारभार काढण्यापासून तुम्हाला कोणी अडवल नाही. वैयक्तिक खुन्नस ठेवून तुम्ही गोकुळ संघाची बदनामी केल्याची टीका संचालिका शौमिका महाडिक यांनी आज पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, माजी पालकमंत्री यांच्या आजच्या पत्रकार परिषदेचा व्हीडिओ ‘गोकुळ’च्याच एका कर्मचाऱ्याच्या माध्यमातून माझ्या पाहण्यात आला. ‘गोकुळ’मध्ये सतेज पाटील यांची सत्ता आहे. त्यामुळे 25 वर्षातला कारभार काढण्यापासून त्यांना कोणी रोखलेलं नाही. तरीही वैयक्तिक खुन्नस ठेऊन त्यांनी संघाची जेवढी बदनामी करायची तेवढी केलीच. त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत. ज्या टँकरच्या मुद्यावरून तुम्ही जिल्हाभर वाद घातला. त्या मुद्यावर तुमची सत्ता असताना मी पत्र दिलं होतं. काय भ्रष्टाचार आहे दाखवा. त्या विषयात तुमच्या या सत्तेत क्लीनचिट दिलेलं पत्र मला मिळालं. आजही माझं आव्हान आहे तुम्ही आमचा भ्रष्टाचार दाखवा. मागच्या 2 वर्षाचा हिशोब मी मागणार. कारण या कालावधीत मी स्वतः संचालक आहे. 5 वर्षासाठी जसे तुम्ही निवडून आले, तसंच मीपण संचालक म्हणून निवडून आले. त्याच माणसांनी मलाही संचालक म्हणून निवडून दिलं. मग माझ्या एकाही पत्राचं उत्तर देण्याचं धाडस तुम्ही का दाखवलं नाही ?
सतेज पाटील यांनी वायफळ बडबड बंद करावी. याची सगळी उत्तरं एक दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन नक्की देईन. त्यांनतर खरं कोण आणि खोटं कोण हे कोल्हापूर जिल्ह्याला कळेल, असे शौमिका महाडिक यांनी म्हटले आहे.