कोष्टी समाज अधिवेशनसाठी राज्यव्यापी बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोष्टी समाज अधिवेशनसाठी
राज्यव्यापी बैठक
कोष्टी समाज अधिवेशनसाठी राज्यव्यापी बैठक

कोष्टी समाज अधिवेशनसाठी राज्यव्यापी बैठक

sakal_logo
By

कोष्टी समाज अधिवेशनसाठी
राज्यव्यापी बैठकीचा निर्णय
इचलकरंजी, ता. २१ : महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे नववे राज्यव्यापी अधिवेशन येथे १३ व १४ मे रोजी हम्पी येथील देवांग पिठाचे मठाधीपती दयानंदपुरी महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी स्थानिकांची प्राथमिक बैठक देवांग मंदिर येथे झाली. अध्यक्षस्थानी देवांग समाज अध्यक्ष विश्‍वनाथ मुसळे होते. बैठकीचे आयोजन महाराष्ट्र कोष्टी समाजसेवा मंडळ मुंबई व श्री देवांग समाज इचलकरंजी यांच्यातर्फे केले होते. प्रारंभी राज्याध्यक्ष प्रकाश सातपुते, प्रकाश कांबळे यांच्या हस्ते चौंडेश्‍वरी मातेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. चर्चेमध्ये राज्यातील प्रमुख समाज बांधवांची अधिवेशन तयारीची बैठक इचलकरंजीत लवकरच घेण्याचे ठरले. रामचंद्र निमणकर यांनी स्वागत केले. याप्रसंगी राहुल सातपुते, महेश सातपुते, प्रवीण होगाडे, पंडित ढवळे, श्रीनिवास फाटक, स्मिता सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी संजय अनिगोळ, दयानंद लिपारे, हेमंत आमणे, स्वप्निल ढवळे, एकनाथ कडोलकर, गणेश मुसळे, दीपा सातपुते आदींचा सत्कार करण्यात आला. राजेंद्र सांगले यांनी आभार मानले. कार्यक्रमास उत्तमराव म्हेत्रे, शितल सातपुते, मनोज खेतमर, दिलीप भंडारे, शुभम रोकडे उपस्थित होते.